ट्विटरचे बहुचर्चित 'ब्ल्यू टीक' फिचर भारतात लॉन्च; 'या' सुविधा मिळणार

ट्विटर
ट्विटर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटर ब्ल्यू टीकची (Twitter Blue Teak) मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. ट्विटर ब्लू टीक हे ट्विटरचे सर्वात लोकप्रिय फीचर असून ही सेवा जगभरात प्रसिद्ध आहे....

आता ही सेवा भारतात (India) लॉन्च झाली आहे. ट्विटर ब्ल्यू ही सबस्क्रिप्शन सेवा अँड्रॉइड Android आणि आयओएस (ios) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर 900 रुपये प्रति महिना पैसे भरून तुमच्या खात्यावर तुम्हाला ब्ल्यू टिक मिळवता येणार आहे. वेबवरील त्याची किंमत फक्त 650 रुपये प्रति महिना असेल तसेच तुम्ही वार्षिक योजना निवडल्यास 566.7 प्रति महिना भरून ट्विटरची ब्ल्यू टिक सेवा मिळवता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

ट्विटर
काँग्रेसकडून पटोलेंना 'ना-ना'?

'असे' मिळवा सब्स्क्रिप्शन

  • ट्विटर ब्ल्यू टिक सब्स्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रोफाइलवरील आतल्या बाजूला डावीकडून स्वाइप करून आतमध्ये जा.

  • त्यानंतर तुम्ही सरळ सबस्क्रिप्शन विंडोवर पोहोचाल.

  • सुविधा घेताना तुम्ही Android, iOS आणि वेब या दोन्हींवर उपलब्ध असल्याची पुष्टी करू शकता.

ट्विटर
...म्हणून कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होऊ शकते

ॲडवान्स फीचर्समधून 'या' सुविधा मिळणार

  • ब्ल्यू टिक

  • एखाद्याला रिप्लाय देताना, उल्लेख (टॅग) आणि शोध घेताना प्राधान्य

  • होम टाइमलाइनमध्ये 50 टक्के कमी जाहिराती

  • मोठे व्हिडिओ पोस्ट करण्याची क्षमता

  • ट्विट संपादन, NFT प्रोफाइल चित्रे आणि 1080p व्हिडिओ अपलोड

  • Twitter ब्लू लॅबच्या वैशिष्ट्यांमध्ये लवकर प्रवेश

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com