Friday, April 26, 2024
HomeUncategorizedव्हॉटसअ‍ॅपमध्ये लवकरच दाखल होणार हे फिचर

व्हॉटसअ‍ॅपमध्ये लवकरच दाखल होणार हे फिचर

मुंबई- Mumbai

दरवेळेस नवनवीन फिचर्स देऊन व्हॉटसअ‍ॅप हे लोकप्रिय अ‍ॅप आपल्या युजर्संना खुश करत असते. आता एका नव्या फिचरचे टेस्टिंग व्हॉटसअ‍ॅप करत असून या फिचरचे नाव मल्टी डिव्हाईस सपोर्ट multi-device support असे असून व्हॉटसअ‍ॅप यामुळे मल्टीपल डिव्हाईसेसवर वापरता येणे शक्य होणार आहे. दरम्यान, सर्वजण खूप काळापासून या फिचरची वाट पाहत होते.

- Advertisement -

व्हॉटसअ‍ॅपचे नवे फिचर ट्रॅक करणार्‍या WABetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या फिचरचे व्हॉटसअ‍ॅप सध्या टेस्टिंग करत असून व्हॉटसअ‍ॅप मल्टिपल डिव्हाईसेसवर सेटअप असल्यावर सुद्धा कॉल रिसिव्ह होऊ शकतो.

WABetainfo ने टिवटद्वारे व्हॉटसअ‍ॅपच्या या फिचरबद्दल दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट मल्टी डिव्हाईसवर कॉन्फिंगर करुन व्हॉटसअ‍ॅपच्या कॉल्सची वेगवेगळ्या डिव्हाईसेसवरुन टेस्टिंग चालू आहे. अद्याप व्हॉटसअ‍ॅपने या फिचरची रिलीज डेट सांगितलेली नाही. मल्टी डिव्हाईस फिचर अ‍ॅक्टीव्हेट झाल्यानंतर तुम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरत असलेल्या सर्व डिव्हाईसेसवर एकाच वेळी एक मेसेज येईल. त्यासोबत तुम्ही केलेल्या सर्व अ‍ॅक्शन्स, रिप्लाय, डाऊनलोड केलेल्या व्हिडिओज आणि इमेजेस सर्व डिव्हाईसवर सिंक राहतील.

व्हॉटसअ‍ॅपने यापूर्वी QR कोड स्कॅन करुन डेक्सटॉपवर व्हॉटसअ‍ॅप चालवण्याचे ड्युअल फिचर सादर केले होते. याच फिचरचे अपग्रेडेट व्हर्जन हे मल्टी डिव्हाईस सपोर्ट हे आहे. व्हॉटसअ‍ॅप जवळपास वर्षभरापासून या नव्या फिचरवर काम करत आहे. WABetainfo ने यापूर्वी दिलेल्या रिपोर्टनुसार, तुम्ही चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर एकाच वेळी व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट पाहू शकाल. विशेष म्हणजे प्रायमरी डिव्हाईस इंटरनेटला कनेक्टेड नसेल तरी इतर डिव्हाईसेसवर तुम्ही मेसेज सेंड किंवा रिसिव्ह करु शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या