आता UPI पेमेंटसाठी असणार लिमिट; पाहा किती व्यवहार करता येणार

आता UPI पेमेंटसाठी असणार लिमिट; पाहा किती व्यवहार करता येणार

मुंबई | Mumbai

सध्या डिजिटल पेमेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता फोनपे, अॅमेझॉन पे, पेटीएमसह गुगल पे या सर्वच कंपन्यांनी पेमेंटवर मर्यादा लावल्या आहेत. त्यामुळे आता तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. पैसे ट्रान्सफर करताना तुम्हाला हे लिमिट माहित नसेल तर तुमचे नुकसान होऊ शकते.

पेमेंटवर लिमिट लावल्याने त्याचा परिणाम देशातील कोट्यवधी यूपीआय युजर्सला होणार आहे. एनपीसीआयकडून याबाबत अधिसूचना जारी करून माहिती देण्यात आली आहे.

आता तुम्ही यूपीआयमधून दररोज 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. त्याचबरोबर काही छोट्या बँकांनी ही मर्यादा 25 हजारांपर्यंत निश्चित केली आहे. कोणत्या अॅपसाठी किती मर्यादा लावण्यात आल्या आहेत ते जाणून घ्या.

आता UPI पेमेंटसाठी असणार लिमिट; पाहा किती व्यवहार करता येणार
नायब तहसीलदारांच्या कानशिलात लगावली

गुगल पे : अ‍ॅपद्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी केवळ 10 व्यवहारांची मर्यादा आहे. तुमचे लिमिट संपले तर व्यवहार करता येणार नाही. गुगल पे द्वारे 1 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवता येऊ शकतात.

पेटीएम : या अ‍ॅपने युजर्ससाठी एक लाख रुपयांपर्यंतची मर्यादा ठेवली आहे. पेटीएमने दर तासाला किती पैसे पाठवायचे याची मर्यादाही घालून दिली आहे. पेटीएमने म्हटले आहे की, आता तुम्ही दर तासाला फक्त 20 हजार रुपयांचे व्यवहार करू शकता. याशिवाय तासाला 5 व्यवहार आणि एका दिवसात फक्त 20 व्यवहार करता येतील.

आता UPI पेमेंटसाठी असणार लिमिट; पाहा किती व्यवहार करता येणार
Ground Report : जिल्ह्यात 'या' ठिकाणी आहे 'चिंचेचे गाव'; जाणून घ्या कुठे

फोन पे : या अ‍ॅपने दररोज यूपीआय व्यवहार मर्यादा 1 लाख रुपये निश्चित केली आहे. एखादी व्यक्ती बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फोनपे यूपीआयद्वारे दररोज जास्तीत जास्त 10 किंवा 20 व्यवहार करू शकते.

अ‍ॅमेझॉन पे : या अ‍ॅपद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवता येणार आहेत. अ‍ॅमेझॉन पे UPI रजिस्ट्रेशननंतर 24 तासांनी तुम्हाला केवळ 5000 रुपये पहिले पाठवता येतील. तर बँकेने 20 व्यवहार करता येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com