आयफोन 12 सिरीज : सात महिन्यांतच 10 कोटी फोनची विक्री

आयफोन 12 सिरीज : सात महिन्यांतच 10 कोटी फोनची विक्री

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

Apple आयफोन 12 सिरीजच्या युनिट्सची 10 कोटींहून अधिक विक्री झाली आहे. काउंटरपॉईंट रिसर्चच्या मोबाइल हँडसेट मार्केट पल्स सर्व्हिसने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार, आयफोन 12 सिरीजने लाँच झाल्याच्या 7 व्या महिन्यातच हा आकडा गाठला आहे...

Iphone12 सिरीजमधील 5 जीची (5G) क्षमता आणि ओएलईडी स्क्रीन (OLED screen) डिस्प्लेमुळे ग्राहक आकर्षित झाले. Apple फोनसाठी सरासरी विक्री किंमत (ASP) सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

टॉप व्हेरिएंटला सर्वाधिक पसंती

आयफोन १२ सिरीजच्या टॉप व्हेरिएंटला (Top variants) ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. आयफोन 12 प्रो मॅक्सच्या (IPhone 12 Pro Max) बेस व्हेरिएंटची लॉन्च किंमत $ 1,099 (सुमारे 82 हजार रुपये) आहे. आयफोन 12 प्रो मॅक्सला नवीनतम 5 जी क्षमता, अधिक रॅम, मेमरी आणि ए 14 बायोनिक चिप मिळते. यामुळेच हा फोन ग्राहकांनी सर्वाधिक पसंत केला आहे.

40 टक्क्यांनी विक्री वाढली

iphone सोबत चार्जर आणि हेडफोन न देण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता परंतु यामुळे ग्राहकांना काहीच फरक पडला नाही. विशेषत: अमेरिकेत आयफोन 12 प्रो मॅक्सच्या विक्रीत 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. अपग्रेडला आयफोन 11 प्रो मॅक्सच्या त्याच किंमतीत 12 प्रो मॅक्सही मिळत होता. याशिवाय कोरोना (Covid-19) महामारी असूनही आयफोन 11 सिरीजच्या तुलनेत आयफोन 12 सिरीजची विक्री कमी झाली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com