Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआयफोन १४ मध्ये फिजिकल सिमची गरज नाही; आता 'या' तंत्रज्ञानाचा होणार वापर

आयफोन १४ मध्ये फिजिकल सिमची गरज नाही; आता ‘या’ तंत्रज्ञानाचा होणार वापर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गेल्या काही दिवसांपासून ॲपलच्या (Apple) आयफोन १५ सीरीजमध्ये (iPhone 15 Series) फिजिकल सिम कार्ड (Physical Sim Card) सपोर्ट करणार नसल्याची चर्चा रंगली होती. ही सिरीज २०२३ मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. आयफोन १५ हा सिम कार्ड स्लॉटशिवाय येणारा पहिला फोन ठरू शकतो….

- Advertisement -

आता अशी माहिती मिळत आहे की, ॲपलच्या आयफोन १४ सीरीजमध्ये (Iphone 14 Series) सिम कार्डचा स्लॉट (Sim Card Slot) नसेल. या स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड स्लॉटऐवजी ई-सिम पर्याय उपलब्ध केला जाणार आहे. व्होडाफोन-आयडिया, जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्या भारतात ई-सिम (E-SIM) सेवा पुरवतात.

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

ॲपलने यापूर्वीच ई-सिम फीचर असलेले स्मार्टफोन बाजारात आणले आहे. कंपनीने सर्वप्रथम आयफोन XS आणि आयफोन XS Max साठी ई-सिम फीचर लॉन्च केले होते. आयफोन १३ सीरीजमध्ये कंपनीने फिजिकल सिम कार्ड स्लॉट व्यतिरिक्त ई-सिमचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला मिळणार विशेष अधिकार; आता आक्षेपार्ह मेसेज आल्यास…

या फोनमध्ये तुम्ही दोन सिम कार्ड वापरू शकता, त्यापैकी एक फिजिकल असेल आणि एक ई-सिम कार्ड असेल. आयफोन १४ मध्ये फक्त ई-सिमचा पर्याय उपलब्ध करणार असल्याची चर्चा आहे.

Visual Story : ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं वाढदिवशीच उरकला साखरपुडा; फोटोज व्हायरल

दरम्यान ई-सिम हे मोबाईल फोनमध्ये स्थापित केलेले व्हर्च्युअल सिम (Virtual SIM) आहे. हे अगदी प्रत्यक्ष सिम कार्डसारखे कार्य करते. जर तुम्ही ई-सिमसाठी अर्ज केला तर तुम्हाला फोनमध्ये कोणतेही कार्ड घालावे लागणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या