Saturday, April 27, 2024
HomeUncategorized५जीच्या स्पर्धेमधून बाहेर पडणार ही चिनी कंपनी

५जीच्या स्पर्धेमधून बाहेर पडणार ही चिनी कंपनी

नवी दिल्ली –

भारत-चीनच्या तणावामुळे ५९ ऍपवर भारत सरकारने बंदी आणली आहे. या वादात आता आणखी एक चिनी कंपनी अडकणार आहे. चिनी कंपनी हुवै भारतात ५ जी सेवा देण्यास प्रयत्नशील होती. भारतात ५जी लिलाव सध्या एका वर्षासाठी टाळण्यात आला आहे. मात्र गेल्यावर्षी हुवैला 5जी ट्रायलमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती.

- Advertisement -

अमेरिका जगभरातील देशांवर दबाव टाकत आहे की, हुवै या कंपनीला बाहेर काढून टाका. अमेरिकेत हुवै कंपनीवर मे २०२१ पर्यंत निर्बंध लादण्यात आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत 5जी संदर्भात चर्चा झाली. गृहमंत्री अमित शाह, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.

अद्याप या बैठकीतील महत्वाचे निर्णय कळलेले नाहीत. भारतात देखील हुवै कंपनीला विरोध केली जात आहे. हुवैच्या संस्थापकांचे पीएलएलसोबत संबंध असल्याचे बोलले जात असल्याने भारतात या कंपनीला विरोध होत आहे. भारत-चीन तणावामुळे हुवैसाठी मार्ग कठीण आहे.

सिंगापुरमध्ये ५जीच्या शर्यतीतून हुवै कंपनी बाहेर पडली आहे. तिथे नोकिया आणि एरिक्सन या दोन कंपन्यांना संधी मिळाली आहे. अमेरिका आणि ऑॅस्ट्रेलियात सुरक्षेच्या कारणावरून हुवै कंपनीला बाहेर काढल आहे. असं म्हटलं जातंय की, भारत सरकार देखील हुवै कंपनीला काढून टाकणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या