सॅटेलाईटवर आधारित बीएसएनएलची आयओटी डिव्हाईस सेवा लाँच

न्यायिक क्षेत्रात असलेल्या सागरी भागाचाही समावेश
सॅटेलाईटवर आधारित बीएसएनएलची आयओटी डिव्हाईस सेवा लाँच

नवी दिल्ली - New Delhi

बीएसएनएलने सॅटेलाईटवर चालणारी इंटरनेट ऑॅफ थिंग्ज (आयओटी) डिव्हाईस सर्व्हिस लाँच केली आहे. ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर नसेल, त्या ठिकाणीही संपर्कयंत्रणा या नव्या सेवेमुळे वापरता येणार आहे.

यामध्ये देशाच्या न्यायिक क्षेत्रात असलेल्या सागरी भागाचाही समावेश आहे. जगात पहिल्यांदाच सॅटेलाईटचा वापर करून नॅरोबँडचे आयओटी नेटवर्कची सेवा देण्यात येणार आहे. ही सेवा बीएसएनएलने अमेरिकेची स्कायलो कंपनीबरोबर भागीदारी करून सुरू केली आहे. त्यासाठी लागणारे उपकरणे स्कायलोने भारतासाठी विकसित केली आहेत. स्कायलोने तयार केलेले उपकरण केवळ सरकारी यंत्रणेला वापरता येणार आहे.

या उपकरणाची 10 हजार रुपये किंमत आहे. हे चौरसाकृती उपकरण देशात कुठेही घेऊन जाता येते. ते स्मार्टफोनला जोडता येते.

परवडणार्‍या दरात तंत्रज्ञान आणि दूरसंचार सेवा ही विविध श्रेणीमधील ग्राहकांना देण्याचे बीएसएनएलचे उद्दिष्ट आहे. त्याला अनुसरूनच हे तंत्रज्ञान असल्याचे बीएसएनएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी सांगितले. कोरोना लसीची वाहतूक करण्यासाठी महत्त्वपूर्ण आकडेवारीही स्कायलोकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे देशाच्या सेवेत मोठे योगदान होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com