Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedसॅमसंगचा उद्योगांसाठी खास टीव्ही लॉंच

सॅमसंगचा उद्योगांसाठी खास टीव्ही लॉंच

नवी दिल्ली – New Delhi

रेस्टॉरंट, किरकोळ विक्रीची दुकाने, शॉपिंग मॉल अशा ठिकाणी ग्राहकांशी योग्य संवाद साधणे व्यावसायिकांना गरजेचे असते. ही गरज लक्षात घेवून सॅमसंगने व्यावसायिक व लघूउद्योगांसाठी अल्ट्रा हाय डेफिनिशन (यूएचडी) बिझनेस टेलिव्हिजन लॉंच केला आहे.

- Advertisement -

सॅमसंग युएचडी बिझनेस टीव्हीमध्ये नवसंशोधन करून विविध अप्लिकेशन्स देण्यात आली आहेत. त्यामुळे टीव्हीमधून चांगला कंटेन्ट आणि दृश्यांचा चांगला अनुभव येतो. कंपनीने टीव्हीवर तीन वर्षांची वॉरंटीही दिली आहे.

ही आहेत (यूएचडी) बिझनेस टेलिव्हिजनची वैशिष्ट्ये

टीव्ही ४३, ५०, ५५ ७० इंचमध्ये उपलब्ध

किंमत ७५ हजार ते १ लाख ७५ हजार

टीव्ही विना वीज १६ तास चालतो.

व्यावसियांना टीव्ही चालू व बंद करण्याचा वेळ निश्चित करता येतो.

टीव्हीमध्ये पाहिजे ते टेम्पलेट निवडता येतात. त्यामध्ये हवा तसा बदल करता येतो.

ऍपमधून कंटेन डाऊनलोड करता येतो.

ऍपमधून रिमोटचे व्यवस्थापन करता येते.

व्यावसायिक आस्थापनांमध्ये उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी अत्याधुनिक टीव्ही तंत्रज्ञानाचा सॅमसंगने वापर केला आहे. ही टीव्ही सॅमसंग बिझनेस ऍपमधूनही वापरता येते. सॅमसंग इंडियाचे (ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स एन्टरप्रायजेस बिझनेस) उपाध्यक्ष पुनित सेठी म्हणाले, की ग्राहकांच्या व्यावसायिक काय गरजा आहेत, यावर आम्ही सातत्याने संशोधन करत आहोत. नव्या बिझनेस युएचडी टीव्हीमध्ये लहान आणि मध्यम व्यावसायिकांच्या गरजांची पूर्तता होणार आहे. तसेच त्यांना कोणताही त्रास न होता सक्षमपणे आणि प्रभावीपणे संवाद करण्यासाठी टीव्ही उपयुक्त ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या