सॅमसंगने लॉंच केला हा बजेट फाेन
गॅजेट

सॅमसंगने लॉंच केला हा बजेट फाेन

Ramsing Pardeshi

मुंबई - Mumbai

सॅमसंग गॅलेक्सी एम०१ एस भारतात लॉंच झाला आहे. हे सॅमसंग गॅलेक्सी एम०१ चे हँडसेटचे नवीन व्हर्जन आहे. या दोन्ही फोनमधील अनेक फीचर्स एकसारखेच आहेत. मात्र नवीन मॉडेलमध्ये मीडियाटेक हीलियो पी२२ प्रोसेसर देण्यात आले आहे. तर जुन्या मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर देण्यात आले होते. नवीन स्मार्टफोनमध्ये २ रियर कॅमेर, ४,००० एमएएच बॅटरी आणि रिअर फींगरप्रिंट सेंसर मिळेल. फोन २ रंगात उपलब्ध आहे. हा फोन लाइट ब्लू आणि ग्रे रंगात मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम०१एस स्मार्टफनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. ड्युअल सिम सपोर्ट हा स्मार्टफोन अँड्राईड पाय ९ वर आधारित वन यूआयवर चालतो. यात ६.२ इंच एचडी (७२०×१,२८० पिक्सल) टीफटी डिस्प्ले आहे. याच्या फ्रंट कॅमेर्‍यासाठी ‘इनफीनिटी व्ही कट’ नॉच मिळेल. फाेनमध्ये ऑॅक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी२२ प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोनच्या कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. व्हर्टिकल रियर कॅमेरा सेटअपमध्ये १३ मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा मिळेल. कॅमेरा लाईव्ह फक्स सपोर्टसह येतो असा कंपनीचा दावा आहे. तर सेफसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम०१एसच्या अन्य फीचर्सबद्दल सांगायचे तर यात डॉल्बी एटएम टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये ब्लूटूथ, वाय-फाय आणि ४जी एलटीईचा समावेश आहे. बायोमॅट्रिक सिक्युरिटीसाठी यात फींगरप्रिंट देखील आहे. फोनमध्ये ४००० एमएएच बॅटरी मिळेल.

Deshdoot
www.deshdoot.com