Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedसॅमसंग गॅलक्सी S20 FE 4G लाँच

सॅमसंग गॅलक्सी S20 FE 4G लाँच

मुंबई | Mumbai

सॅमसंग कंपनीने आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. परंतु या फोनची लाँचिंग काही ठराविक ठिकाणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

सॅमसंगने निवडक मार्केट्स मध्ये आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलक्सी S20 FE 4G लाँच केला आहे. जर्मनी, मलेशिया आणि व्हिएतनाममध्ये लाँच केलेल्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिले आहे. हे फोन मॉडल नंबर SM-G780G सोबत येतो.

याआधी कंपनीने SM-G780F मॉडल नंबर सोबत ओरिजनल गॅलेक्सी एस २० ईएफ व्हेरियंट लाँच केले होते. परंतु, जुना फोन स्नॅपड्रॅगनच्या जागी एक्सीनॉस ९९० प्रोसेसर सोबत येतो. नवीन गॅलेक्सी एस २० ईएफ ४ जी गेल्या वर्षी भारतात लाँच करण्यात आलेल्या ग्लोबल व्हेरियंट सारखा आहे.

सॅमसंग गॅलक्सी S20 FE 4Gच्या ८ जीबी १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २,९९९ MYR जवळपास ४१ हजार ३०० रुपये आहे. फोनला मलेशिया मध्ये सॅमसंगच्या अधिकृत रिटेल पार्टनर शॉपीवर ब्लू, ऑरेंज आणि व्हॉयल या कलरमध्ये लिस्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या