JioPhone Next? काय आहेत याचे फिचर्स

JioPhone Next? काय आहेत याचे फिचर्स

मुंबई | Mumbai

रिलायन्स एजीएम 2021 मध्ये कंपनीच्या वतीने अनेक घोषणा करण्यात आल्या. यात गूगलच्या सहकार्याने नवीन किफायतशीर फोन JioPhone Next देखील जाहीर करण्यात आला. यावेळी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाईदेखील उपस्थित होते. गुगल आणि जिओ यांनी मिळून एक परवडणारा फोन सादर केला आहे. 10 सप्टेंबर 2021 म्हणजेच गणेश चतुर्थीला हा फोन बाजारात उपलब्ध होणार असल्याची घोषणा रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली....

या फोनची किंमत जाहीर केली नसली तरी याला जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हटले जात आहे. गुगलने याबद्दल एका ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे.

ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, साथीच्या आजारांमुळे ऑनलाइन सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. वेळेवर माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा उपयोग असणे खूप महत्वाचे आहे. यामुळे गुगल कंपनी जिओसोबत एक स्वस्त स्मार्टफोन आणत आहे.

बेसिक फोन वापरणाऱ्या भारतातील लक्षावधी लोकांना स्मार्टफोनमध्ये प्रवेश हवा आहे. गुगलची अँड्रॉइड टीम यावर कार्य करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत होती. यासाठी गुगलने गेल्या वर्षी जियो प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली.

गुगलने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमने एक डिव्हाइस बनवले आहे. याला जिओफोन नेक्स्ट असे नाव देण्यात आले आहे. ज्यांनी कधीही स्मार्टफोन ऑपरेट केला नाही त्यांच्यासाठी एक उत्तम स्मार्टफोन बाजारात येणार आहे.

काय आहे या फोनमध्ये?

या व्यतिरिक्त गुगलने जिओ टीमच्या सहकार्याने व्हॉईस-फर्स्ट फीचर तयार केले आहे. याद्वारे, वापरकर्ते फोनवर त्यांच्या स्वतःच्या भाषेमधील साहित्य पाहू शकतात. यासह एक चांगला कॅमेरादेखील या स्मार्टफोनला देण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com