Saturday, April 27, 2024
HomeUncategorized५ कॅमेरे असलेला Redmi Note 9 भारतात लॉन्च

५ कॅमेरे असलेला Redmi Note 9 भारतात लॉन्च

मुंबइ – Mumbai

शाओमीने रेडमी नोट ९ भारतात लॉन्च केला आहे. भारतीय बाजारात रेडमी नोट ९ चा हा तिसरा हँडसेट आहे. यापूर्वी, शाओमीने मार्च महिन्यात रेडमी नोट ९ प्रो आणि रेडमी नोट ९ प्रो मॅक्स लॉन्च केले होते. रेडमी नोट ९ हा ४ रियर कॅमेरा सेटअप आणि होल-पंच डिस्प्ले डिझाइनसह लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनला रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट आहे आणि रेडमी नोट ८ वर अपग्रेड म्हणून तो बाजारात आणला गेला आहे. मागील प्रकारांच्या तुलनेत हा हँडसेट २५ टक्के मोठ्या बॅटरीसह येतो. रेडमी नोट ९ मध्ये ६ जीबीपर्यंत रॅम मिळेल. हा फोन सॅमसंग गॅलेक्सी ए २१, ओप्पो ए ९२०२० आणि व्हिवो एस १ प्रो सारख्या हँडसेटला टक्कर देऊ शकतो.

- Advertisement -

रेडमी नोट ९ची किंमत भारतात ११,९९९ रुपये पासून सुरू होते. ही किंमत ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज पर्याय देखील आहे. त्याची किंमत १३,४९९ रुपये आहे. रेडमी नोट ९ चा सर्वात प्रीमियम व्हेरिएंट ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज मॉडेल आहे. तो १४,९९९ रुपयांना मिळेल. हा स्मार्टफोन एक्वा ग्रीन, आर्कटिक व्हाइट आणि पॅबल ग्रे रंगात उपलब्ध असेल. रेडमी नोट ९ चा पहिला सेल २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भारतात सुरु होईल. मी डॉट कॉम आणि मी होम स्टोअरमधून तो विकत घेता येईल.

रेडमी नोट ९ एप्रिल महिन्यात जागतिक बाजारात बाजारात आणला गेला. हा फोन ३ जीबी रॅम ६४ जीबी, ४ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज पर्यायमध्ये उपलब्ध आहे.

ड्युअल-सिम रेडमी नोट ९ एमआययूआय ११ वर चालतो. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ सह ६.५३-इंचाचा फुल-एचडी (१,०८० र्े२,३४० पिक्सेल) आयपीएस डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हेलीओ जी ८५ प्रोसेसर वापरला आहे. ४ जीबी आणि ६ जीबी रॅम आहे. इनबिल्ट स्टोरेजसाठी दोन पर्याय आहेत. ६४ जीबी आणि १२८ जीबी. आवश्यक असल्यास १२८ जीबी पर्यंतचे मायक्रोएसडी कार्ड देखील टाकता येऊ शकते.

रेडमी नोट ९ मालिकेच्या उर्वरित ङ्गोनप्रमाणेच, यात क्वाड कॅमेरा सेटअप देखील आहे. एफ १.७९ लेन्ससह ४८ मेगापिक्सलचा सॅमसंग जीएम १ प्राथमिक सेन्सर आहे. तेथे अल्ट्रा-वाइड-एंगल एफ २.२ लेन्ससह ८-मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा देखील आहे. याशिवाय येथे २ मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये १३-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

रेडमी नोट ९ मध्ये ५,०२० एमएएचची बॅटरी आहे. ही १८ें फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. शिओमीने सोबत २२.५ वॅटचा लवकर चार्ज होणारा चार्जर दिला आहे. कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांमध्ये वाय-फाय, यूएसबी, टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, ऑॅडिओ जॅक, एनएफसी, इन्फ्रारेड ब्लास्टर, जीपीएस आणि ए-जीपीएस आहेत. मागे फिंगरप्रिंट सेन्सर हा क्वाड कॅमेरा सेटअपच्या खाली देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या