Friday, April 26, 2024
HomeUncategorizedरियलमी एक्स७ मॅक्स ५जी स्मार्टफोन लॉन्च

रियलमी एक्स७ मॅक्स ५जी स्मार्टफोन लॉन्च

मुंबई | Mumbai

रियलमी इंडिया आज भारतात रियलमी एक्स7 मॅक्स 5जी स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. यापूर्वीच हा स्मार्टफोन लॉन्च होणार होता. मात्र करोना संकटामुळे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आलं होतं.

- Advertisement -

रियलमी इंडिया आज भारतात रियलमी एक्स7 मॅक्स 5जी स्मार्टफोन लॉन्च करण्यात आली आहे. यापूर्वीच हा स्मार्टफोन लॉन्च होणार होता. मात्र करोना संकटामुळे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. या स्मार्ट फोनची लॉचिंग अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली आहे.

स्मार्ट फोनची वैशिष्ट्ये

Realme X7 Max 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC प्रोसेसर दिला आहे. तसंच 6.43 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले punch-hole cutout आणि 120Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे. 12जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून तुम्ही स्टोरेज वाढवू शकता.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून 64MP चा प्रायमरी सेन्सर 8MP वाईल्ड एंगल लेन्स आणि 2MP चा कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 वर आधारित Realme UI 2.0 वर बनवला आहे. यामध्ये 4,500mAh ची बॅटरी 50W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 25,000 ते 30,000 च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या