रियल मी एक्स २
रियल मी एक्स २
गॅजेट

रियल मी एक्स २ नवा वेरियंट भारतात लॉन्च

जाणून घ्या फिचर्स

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई । Mumbai

रिअलमीने भारतात Realme 6 चा स्टोरेज वेरियंट लॉन्च केला आहे. यामध्ये 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिला आहे. ऐवढेच नाही तर लोकप्रिय स्मार्टफोन Realme X2 चे ही नवे वेरियंट लॉन्च केले आहे. नव्या वेरियंटमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिला आहे. हा स्मार्टफोन एकूण चार वेरियंटमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याची सुरुवाती किंमत 16,999 रुपये आहे.

कंपनीने आतापर्यंत Realme X2 च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलच्या किंमतीबाबत खुलासा केलेला नाही. परंतु येत्या 21 जुलैला सेल लावण्यात येणार आहे. रिअलमी एक्स 2 च्या तीन स्टोरेज मॉडेल भारतात यापूर्वीपासून ओपन सेलच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले आहेत.

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास त्यात 4GB+64GB मॉडेलची किंमत 17,999 रुपये आणि 8GB+126GB मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन पर्ल ब्लू. पर्ल व्हाइट आणि पर्ल ग्रीन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे

या स्मार्ट फोनची फीचर्स पुढीलप्रमाणे

6.4 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले

Qualcomm Sanpdragon 730G प्रोसेसर

64MP चा प्रायमरी सेंसर, 8MP चा वाइड अँगल लेस आणि 2MP असे दोन अन्य लेंस, स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 32MP

पॉवर बॅकअपसाठी 4000mAh ची बॅटरी

जी 30W VOOC फ्लॅश चार्ज सपोर्ट

Deshdoot
www.deshdoot.com