बहुप्रतीक्षित पोको एम ३ लवकरच होणार भारतात लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

बहुप्रतीक्षित पोको एम ३ लवकरच होणार भारतात लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

नवी दिल्ली l New Delhi

पोको एम ३ स्मार्टफोन येत्या (दि. २४) नोव्हेंबरला लाँच केला जाणार आहे, पोको कंपनीने स्वत: ट्विटरद्वारे याचा खुलासा केला आहे. या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये लॉन्च होण्यापूर्वीच ऑनलाईन लीक झाली आहेत. टिपस्टरने ही माहिती यूट्यूब व्हिडिओद्वारे सार्वजनिक केली आहे.

टिपस्टरच्या मते, पोको एम ३ मध्ये ६.५३ इंचाची फुल एचडी + डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह असणार आहे. त्याशिवाय हा फोन नुकताच गीकबेंचवर मॉडेल नंबर एम २०१० जे १९ सीजी सह सूचीबद्ध करण्यात आला आहे.

जेथे ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसरची माहिती समोर आली आहे. तसेच फोनमध्ये ड्युअल स्पीकर्स देण्यात येणार आहे. यासह १८ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६,००० एमएएचची मजबूत बॅटरी फोनमध्ये दिली जाईल असा दावा टिपस्टरने केला आहे.

फोटोग्राफीसाठी असे म्हटले आहे की, या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्याचा प्राइमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सेल असेल. तथापि, उर्वरित दोन कॅमेरांची माहिती सध्या स्पष्ट झालेली नाही. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट कॅमेर्‍याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com