ऑनलाईन पेमेंट होणार अधिक सुरक्षित; ‘कसे’ ते जाणून घ्या

ऑनलाईन पेमेंट होणार अधिक सुरक्षित; ‘कसे’ ते जाणून घ्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

ऑनलाईन पेमेंट (Online Payment) सुविधा आता नववर्षात आणखी सुरक्षित होणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून आरबीआय (RBI) ने ऑनलाईन पेमेंटसाठी कार्ड टोकेनायजेशन प्रणाली (Tokenization System) लागू करण्यास मंजुरी दिली आहे...

आता ऑनलाईन पेमेंटसाठी नव्या व्यवस्थेत टोकन सिस्टम (Token system) असेल. या माध्यमातून व्यवहारादरम्यान कार्ड नंबर (Card Number), सीवीवी (CVV) आदींचा वापर केला जाणार नाही.

त्याच्याजागी एक प्रकारचा टोकन नंबर जनरेट केला जाणार आहे. यामुळे कार्ड होल्डरची कुठलीही माहिती थर्ड पार्टीकडे जाणार नाही हा याचा सर्वात महत्वाचा फायदा आहे.

ऑनलाईन शॉपिंग पोर्टल फास्ट ट्रान्झेक्शनसाठी कार्ड होल्डरचे डिटेल्स सेव्ह करतात. यामुळे युजरचा डेटा लीक होऊन फ्रॉड झाल्याचे समोर आले आहे. नवीन टोकेनायजेशनमुळे हा प्रकार कमी होईल, असा दावा आरबीआयकडून करण्यात आला आहे.

1 जानेवारी 2022 पासून प्रत्येक डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवरुन पेमेंट करताना 16 डिजीट नंबर ऑनलाईन वेबसाईटला द्यावा लागणार आहे.

या सर्व्हिसला CoFT (Permitting Card on File Toknisation) असे म्हटले जाते. या माध्यमातून व्हिजा, मास्टरकार्ड, रुपे कार्डसारखे सर्विस प्रोवाइडर ग्राहकांचा कार्ड नंबर, सीवीवी आणि इतर डिटेल्सच्या जागी आता 16 अंकी नंबर जारी करतील, जो ग्राहकाच्या कार्डशी लिंक असणार आहे.

सुरुवातीला टोकेनायजेशन ही सर्व्हिस सर्वांसाठी अनिवार्य नसेल. या सर्व्हिस वापर युजर आपल्या इच्छेनुसार करू शकतात. युजरला कार्डसाठी टोकन जनरेट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर कार्ड कंपनी टोकन जनरेट करेल. सर्व्हिससाठी युजरकडून कुठलेही पैसे आकारले जाणार नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com