Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedबहुप्रतीक्षित OnePlus 8T लवकरच होणार भारतात लॉन्च

बहुप्रतीक्षित OnePlus 8T लवकरच होणार भारतात लॉन्च

नवी दिल्ली l New Delhi :

बहुप्रतीक्षित असलेला OnePlus 8T लवकरच भारतात लॉन्च करण्यात होणार आहे. येत्या दि. १४ ऑक्टोबर (बुधवार) रोजी वन प्लस ८टी भारतात लॉन्च होणार आहे.

- Advertisement -

वन प्लस या चिनी कंपनीने सोमवारी प्रेस नोट जारी करत या संदर्भात माहिती दिली आहे. एप्रिलमध्ये जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आलेल्या वन प्लस ८ ने मिळवलेल्या प्रचंड लोकप्रियतेनंतर आता कंपनी वन प्लस ८टी लॉन्च करण्याचे ठरवले आहे.

या नव्या वन प्लस ८टी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५+ प्रोसेसर आणि आउट-ऑफ-द-बॉक्स अँँन्ड्राइड ११ देण्यात आल्याची माहिती आहे. यासह वन प्लस ८ च्या तुलनेत वन प्लस ८टीच्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले जाण्याची शक्यता आहे.

भारतात वन प्लस ८टीचे लॉन्चिंग कारोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑनलाइन स्ट्रीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वन प्लस इंडियाच्या ऑफीशिअल वेबसाइटवर दि. १४ ऑक्टोबर रोजी संध्या. ०७ : ३० मि. सुरू होईल. अॅमेझॉनने मायक्रोसाइट तयार करून नवा स्मार्टफोन उपलब्ध होणार असल्याची माहिती आधीच दिली आहे. तसेच हा स्मार्टफोन वनप्लस.इन सोबतच ऑफलाइन स्टोअर्सवरही उपलब्ध होणार आहे.

वन प्लस ८टी स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंच फुल-एचडी + डिस्प्ले आणि एक १२०Hz रिफ्रेश रेट असण्याची शक्यता आहे. त्याचसोबत हा फोन अँँन्ड्राइड ११ वर आधारित ऑक्सिजन ओस ११ वनप्लस ८टी फोन सुरु राहिल. ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५+ प्रोसेसर आणि १२ जीबीपर्यंतचा रॅम असू शकतो. २५ जीबी ऑन बोर्ड स्टोरेज ऑप्शन मिळू शकतो.

तसेच यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल शूटर आहे. फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त यामध्ये ४,५००mAh बॅटरी, ६५W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत मिळू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या