Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआता व्हॉट्स अँपवर शॉपिंग करता येणार

आता व्हॉट्स अँपवर शॉपिंग करता येणार

मुंबई | Mumbai

व्हॉट्सअ‍ॅप वरील हे कार्ट फीचर ई कॉमर्स साईटवरील ‘अ‍ॅड टू कार्ट’प्रमाणेच काम करणार आहे. यामुळे ग्राहकांना एका वेळेस अनेक वस्तू ऑर्डर करण्याची मुभा मिळणार आहे.

- Advertisement -

व्हॉट्स अँप मध्ये अनेक फीचर्स अपडेट करून युजर्सना नवनव्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आता नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने Carts चा पर्याय त्याच्या माध्यमातून शॉपिंग करण्याचा अनुभव अधिक सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान महिन्याभरापूर्वीच शॉपिंग बटन फीचर जोडण्यात आलं होतं. व्हॉट्सअ‍ॅप वरील हे कार्ट फीचर ई कॉमर्स साईटवरील ‘अ‍ॅड टू कार्ट’ प्रमाणेच काम करणार आहे. यामुळे ग्राहकांना एका वेळेस अनेक वस्तू ऑर्डर करण्याची मुभा मिळणार आहे.

कसं वापराल कार्ट फीचर?

तुम्ही फॉलो करत असलेल्या, संवाद साधत असलेल्या कोणत्याही बिझनेस अकाऊंट मध्ये जा.

कॅटलॉगमधून तुम्हांला हव्या असलेल्या वस्तूंची निवड करा. त्यासाठी “add to cart” वर क्लिक करा.

मग तुमची खरेदी पूर्ण झाल्यानंतर कार्ट तुम्ही मेसेजच्या स्वरूपात त्या व्यावसायिकाला पाठवू शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या