Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआता WhatsApp वर पाठवलेला मेसेज करता येणार एडिट, जाणून घ्या कसे?

आता WhatsApp वर पाठवलेला मेसेज करता येणार एडिट, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

मेटा कंपनीच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात २ अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत. व्हॉट्सअ‍ॅप अनेक वेळा आपल्या वापरकर्त्यांसाठी नवे फीचर्स लॉन्च करते…

- Advertisement -

आता व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा एकदा आपल्या वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाचे जबरदस्त फीचर घेऊन येणार आहे. वापरकर्त्यांना पाठवलेले मेसेज या फिचरच्या माध्यमातून एडिट करता येणे शक्य होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या फीचरची टेस्टिंग करत आहे. या फीचरमधून वापरकर्त्यांना त्यांनी पाठवलेला एखादा मेसेज 15 मिनिटांपर्यंत एडिट करता येणे शक्य होईल. तसेच येत्या काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना चॅटबॉक्समधील ‘चॅट एडिट’ करण्याचा पर्यायही मिळणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

जर तुम्ही पाठवलेल्या एखाद्या मेसेजमध्ये काही व्याकरणाच्या चुका झाल्यास त्या दुरुस्त करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच पाठवलेल्या मेसेजमध्ये तुम्हाला काही आणखी माहिती जोडायची असल्यास किंवा काढून टाकायची असल्यास एडिट फीचरमुळे मोठा फायदा होणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? कथित बंगलो प्रकरणी गुन्हा दाखल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आयफोन वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉलिंगसाठी ‘PiP’ मोड रोल ऑउट केले, याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपने ‘केप्ट मेसेज’ फीचरही सुरु केले आहे.

घरकुल योजनेजवळच्या भंगार दुकानांना भीषण आग

- Advertisment -

ताज्या बातम्या