आता स्मार्टफोन करणार टीव्ही कंट्रोल; गुगल आणतय नवे ॲप

आता स्मार्टफोन करणार टीव्ही कंट्रोल; गुगल आणतय नवे ॲप

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गुगल लवकरच टीव्ही कंट्रोल करणारे ॲप (TV Control App) येणार आहे. गुगल टीव्ही (Google TV) या ऍपवर गुगल सध्या काम करत आहे. या ॲपच्या माध्यमातून अँड्रॉइड टिव्हीवर (Android TV) नियंत्रण ठेवता येणार आहे. हे ॲप गुगल लवकरच लॉन्च करणार आहे. त्यामुळे आता टिव्ही कंट्रोल करण्यासाठी रिमोटची गरज लागणार नाही...

Google Android टिव्ही रिमोट ऑप्शन 4.27 व्हर्जन आणणार आहे. याचे टेस्टींग सध्या सुरु आहे. गुगलचे Android TV Remote control App सध्या Play Store मध्ये उपलब्ध आहे.

जे अद्याप अपडेट करण्यात आलेले नाही. गुगलचे नवीन फिचर तयार झाल्यावर हे ॲप अपडेट होण्याची शक्यता आहे. तर, गुगल नवीन टिव्ही ॲपदेखील आणू शकते अशीही शक्यता आहे.

अद्याप हे ॲप पूर्णपणे तयार झालेले नाही. गुगलकडून या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हे ॲप आधी आपल्या टीव्हीबरोबर पेअर करावे लागेल. त्यानंतर ते आपल्याला टीव्हीच्या कंट्रोल लिस्टमध्ये दिसेल. पेअरिंग करताना त्यात 4 अंकी कोड टाकावा लागेल.

हा 4 अंकी कोड आपल्या टीव्ही स्क्रीनवर दिसेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपला स्मार्टफोन टीव्ही रिमोट म्हणून काम करेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com