आता Google Meet वर करा Live Translation

आता Google Meet वर करा Live Translation

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

सध्या वर्क फ्रॉम होम (Work from Home) चा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक कंपन्या ऑनलाईनच्या माध्यमातून मीटिंगसह विविध कामे करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन मीटिंगची (Online Meeting) संख्यादेखील वाढली आहे...

यासाठी अनेक प्रकारचे Apps उपलब्ध आहेत. ऑनलाईन कॉल (Online call) किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (Video Conferencing) हे व्हर्च्युअल शाळेसाठीसुद्धा वापरले जात आहे. अशात गुगल मीटचा (Google Meet) सर्वाधिक वापर केला गेला.

आता गुगल मीटवर लवकरच एक नवीन फीचर (New Feature) येणार आहे. गुगल मीटने आता लाईव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शन (Live Translated Captions) फीचरचे टेस्टिंग सुरू केने आहे. ज्याद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अधिक चांगले होण्यास मदत होणार आहे.

गुगल मीट व्हिडिओ कॉल (Google Meet Video call) अधिक प्रभावी होण्यासाठी हे फीचर मदत करेल. हे फीचर युजर्सला आपल्या भाषेत कंटेंटचा वापर करण्यासाठी, माहिती शेअर करण्यासाठी आणि शिकण्यासाठी मदत करणार असल्याचे गुगलने (Google) म्हटले आहे.

गुगल मीटच्या लाईव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचे टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे. हे फीचर सुरुवातीला इंग्रजीतील मीटिंग्सला सपोर्ट करेल, ज्याच ट्रान्सलेशन स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, पोर्तुगालमध्ये केले जाईल. यासाठी युजर्सला Settings मध्ये Captions वर स्विच करावे लागेल आणि खाली Translated Captions वर टॉगल करुन सेट करावे लागेल.

Related Stories

No stories found.