Friday, April 26, 2024
HomeUncategorizedनोकियाचा 'हा' फोन 'स्मार्ट' बाजारात करणार धमाका

नोकियाचा ‘हा’ फोन ‘स्मार्ट’ बाजारात करणार धमाका

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

नोकिया (Nokia) कंपनी लवकरच एक नवा स्मार्टफोन (Smartphone) लाँन्च करण्याच्या तयारीत आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने नोकिया जी ११ (Nokia G11) हा स्मार्टफोन बाजारात आणला होता. आता कंपनी या फोनच्या अपडेटेड व्हर्जनवर (Updated Version) काम करत आहे….

- Advertisement -

हा अपडेटेड फोन नोकिया जी ११ प्लस (Nokia G11 Plus) या नावाने बाजारात दाखल होईल. फोनमध्ये कॅमेरा (Camera) चांगला असून बॅटरी बॅकअपदेखील (Battery Backup) चांगला मिळणार आहे.

या फोनला ऑक्टाकोर युनिसॉक (Unisoc) प्रोसेसर मिळेल. या स्मार्टफोनची रॅम 4 GB असेल. हा नोकिया G11 सारखा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन असेल. Nokia G11 मध्ये 6.5-इंचाची IPS LCD स्क्रीन एक टीयरड्रॉप नॉचसह आली होती. या स्मार्टफोनची स्क्रीन 720 x 1600 पिक्सेलचे HD+ रिझोल्यूशन देईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या