Friday, April 26, 2024
HomeUncategorizedव्हॉट्सॲपने चॅट बॅकअपच्या सुरक्षेसाठी उचलले ‘हे’ पाऊल

व्हॉट्सॲपने चॅट बॅकअपच्या सुरक्षेसाठी उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्सॲप (whatsapp) नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर घेऊन येत असते. आता व्हॉट्सॲपने (whatsapp) चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह (End-to-end-encryption) क्लाउड स्टोरेजवर सेव्ह करण्याचे फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. हे फीचर कंपनीने आयओएस (iOS) आणि अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी रोलआउट केले आहे…

- Advertisement -

अनेक दिवसांपासून व्हॉट्सॲप कंपनी या फीचरवर काम करत होती. या फीचरमुळे युजर्सला आपली चॅट हिस्ट्री (Chat History) क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह करण्याचा ऑप्शन मिळेल आणि प्रायव्हसीही (privacy) कायम राखता येईल.

आधी केवळ व्हॉट्सॲप चॅट (WhatsApp Chat) एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड होते. मात्र आता व्हॉट्सॲप बॅकअपदेखील (WhatsApp Backup) एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड होणार आहे.

आता हे फीचर टप्प्याटप्प्याने जगभरात रोलआउट होत आहे. सध्या कंपनी युजर्सचा अनुभवाची पडताळणी करत आहे, जेणेकरुन एखाद्याला काही समस्या असल्यास, ती दूर करता येईल. त्यानंतर कंपनी हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध करणार आहे.

जर एखाद्या युजरचा फोन हरवला, तर तो युजर दुसऱ्या फोनमध्ये लॉगइन करुन जुनी चॅट हिस्ट्री पाहू शकतो. हे या फीचरचे वैशिष्ट आहे.

लस घ्या, मास्क घाला, जीव वाचवा; सांगतय गुगलचं डूडल

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (End-to-end-encryption) चा वापर करुन बॅकअपच्या सुरक्षेसाठी एक वैयक्तिक पासवर्ड किंवा 64-बीट एन्क्रिप्शन Key निवडता येते. जर पासवर्ड विसरलात, तर WhatsApp तुमच्या चॅट हिस्ट्रीला एन्क्रिप्टेड बॅकअपमधून रिस्टोर करण्यासाठी तुमची मदत करू शकत नाही. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन कसं ऑन कराल?

  • WhatsApp चं लेटेस्ट वर्जन इन्स्टॉल करावं

  • WhatsApp Setting मध्ये जावं

  • चॅट सेक्शनमध्ये चॅट बॅकअप पर्याय निवडा

  • End-to-end Encrypted Backup सेटिंग ऑन करा.

  • पासवर्ड सेट करा.

तुम्ही 64 डिजीट encryption key ऑटोमेटिकली सेट करू शकता. यानंतर तुमच्या फोनवर बॅकअप प्रोसेस सुरू होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या