Friday, April 26, 2024
HomeUncategorizedYouTube Shorts चं नवं फीचर; आता व्हिडीओ बनवणं अधिक रंजक होणार

YouTube Shorts चं नवं फीचर; आता व्हिडीओ बनवणं अधिक रंजक होणार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

मागील वर्षी गुगलने (Google) युट्यूब शॉर्ट्स (YouTube Shorts) लॉन्च केले होते. टिकटॉकसोबत (TikTok) स्पर्धा करण्यासाठी युट्यूब शॉर्ट्स काढण्यात आले. लॉन्चच्या वेळी युट्यूब शॉर्ट्समध्ये अत्यंत कमी फीचर्स देण्यात आले होते…

- Advertisement -

परंतु आता वेगवेगळे फिल्टर्स (Filters), ऑटोमॅटिक कॅप्शन (Automatic caption) आणि कलर करेक्शनसारखे (Color correction) फीचर्सचा समावेश युट्यूब शॉर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

आज युट्यूब शॉर्ट्स शंभरहून अधिक देशांमध्ये वापरले जात आहे. याला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. आता कंपनी एका नवीन फिचरवर काम करीत आहे. लवकरच हे फीचर युझर्ससाठी उपलब्ध होईल.

आयफोन १४ मध्ये फिजिकल सिमची गरज नाही; आता ‘या’ तंत्रज्ञानाचा होणार वापर

युट्यूब शॉर्ट्समध्ये कंपनी आता व्हॉईस ओव्हरचे (Voice over) फिचर देण्याच्या तयारीत आहे. याचे कारण सध्या कंन्टेंट क्रिएटर्सला व्हिडीओ बनवताना युट्यूबच्या लायब्ररीतून ऑडिओ घ्यावा लागतो. या फिचरच्या माध्यमातून युझर्स आपल्या व्हिडीओला आपला स्वतःचा आवाज देऊ शकतील.

आता व्हॉट्सअ‍ॅपवरच करता येणार फोटो, व्हिडीओ एडीट; ‘अशी’ आहेत वैशिष्ट्ये

व्हॉइस ओव्हर फीचरची सध्या टेस्टिंग सुरु आहे. व्हॉईस ओव्हर फीचर यूट्यूब शॉर्ट्स बीटा व्हर्जन १७.०४.३२ वर उपलब्ध होणार आहे. यूजर्सला व्हॉईस ओव्हरसाठी वेगळे बटण मिळणार आहे. सध्या, कस्टम ऑडिओ क्लिप जोडण्यासाठी कंटेन्ट क्रिएटर्सला थर्ड पार्टी व्हिडिओ एडिटरचा वापर करावा लागतो.

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला मिळणार विशेष अधिकार; आता आक्षेपार्ह मेसेज आल्यास…

भारत सरकारने मागील वर्षी लोकप्रिय ॲप टिकटॉकवर बंदी घातली. त्यानंतर इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) आणि यूट्यूब शॉर्ट्स (YouTube Shorts) खूप गाजले आहे. यामुळे कंपनीला खूप फायदा झाला. सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत इंस्टाग्राम अव्वल आहे. गेल्या वर्षी, युट्युबने (YouTube) निर्मात्यांसाठी ७३५ कोटींचा निधी (Fund) जारी करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या