आता समजणार फोटोचं लोकेशन

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली – New Delhi

सध्या डिजिटल युगात आणि स्मार्टफोन जवळ असताना फोटो काढणं अतिशय सोपं झालं आहे. कोणीही, कितीही फोटो काढू शकतो. अनेकदा सहलींना जातो आणि त्या ठिकाणी फोटो क्लिक करतो. काही वर्षांनी हा फोटो कुठं काढला होता हे विसरतो. पण आता हे आठवत बसायची गरज नाही, कारण गुगलनेच गुगल फोटोजमध्ये ही सुविधा देणार असल्याचं जाहीर केलंय.

आपल्या स्मार्टफोनमधलं लोकेशन हा पर्याय सुरू ठेवला, तर आपण दिवसभर कुठे गेलो, किती वाजता गेलो ही सगळी माहिती गुगल मॅप्सवर दिसते. बहुतांश लोक या फीचरचा वापर करत नाहीत, पण जेव्हा आपण या वेळी कुठं होतो हे शोधायची वेळ येते तेव्हा मात्र ते ही सुविधा वापरतात.

गुगल फोटोजच्या 5.23.0 या व्हर्जनपासून गुगल फोटोजमध्येही गुगल मॅप्ससारखी लोकेशन सांगण्याची सुविधा कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच गुगलने गुगल फोटोजमध्ये सिनेमा हे नवं फीचर आणणार असल्याचं जाहीर केलं होतं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *