Netflix चा पासवर्ड शेअर करणे टाळा नाहीतर…; कंपनीने दिला ‘हा’ इशारा

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

नेटफ्लिक्सच्या (netflix) युझर्ससाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आता नेटफ्लिक्स कंपनीने आपल्या प्लानमध्ये मोठे बदल केले आहेत….

यानुसार कुटुंबाबाहेरील लोकांना आता युझरने नेटफ्लिक्स अकाउंट (Netflix account) दिले तर कंपने अतिरिक्त शुल्क आकारणार आहे. सध्या कंपनी एका कुटुंबातील सदस्यांना नेटफ्लिक्सचा (Netflix) पासवर्ड शेअर करण्याची परवानगी देते. मात्र पासवर्ड (Password) घराच्या बाहेर शेअर केल्यामुळे चांगल्या कंटेंटमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता कमी होत आहे, असे असे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने म्हंटले आहे की, सर्वप्रथम चिली, कोस्टा, रिका आणि पेरू येथे अतिरिक्त सदस्य जोडा (add an Extra Member) या फिचरचे टेस्टिंग केले जाईल. अतिरिक्त मेंबरला वेगळा लॉगइन आयडी (Login ID) आणि पासवर्ड (Password) मिळेल. तसेच त्या अतिरिक्त मेंबरला सुमारे दोन ते तीन डॉलर दरमहिना अतिरिक्त मोजावे लागतील.

युझर्स आपले प्रोफाईल नवीन अकाउंटमध्ये ट्रान्सफर (Transfer) करू शकतील. जास्तीत जास्त दोन सब अकाउंट (Sub Account) जोडता येतील. लवकरच हे नवे फिचर जारी करण्यात येईल. टेस्टिंग (Testing) पूर्ण झाल्यानंतरच हे फिचर उपरोक्त देशांच्या बाहेर सादर करायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *