Microsoft Surface Duo या दिवशी होणार लॉंच
गॅजेट

Microsoft Surface Duo या दिवशी होणार लॉंच

Ramsing Pardeshi

मुंबई - Mumbai

मायक्रोसॉफ्टच्या बहुप्रतिक्षित सर्फेस ड्युओ Surface Duo या कंपनीच्या ड्युअल स्क्रिन फोनची जगभरात चर्चा सुरू आहे. हा फोल्डेबल नसून, ड्युअल स्क्रीन फोन आहे. हा फोन कधी लॉंच होणार याची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती, मात्र आता कंपनीने लॉंचिंगच्या तारखेची माहिती दिली आहे.

मायक्रोसॉफ्ट सर्फेस ड्युओ स्मार्टफोन १० सप्टेंबरला लॉंच होणार आहे. या फोनला मागील वर्षी ऑॅक्टोबरमध्ये सादर करण्यात आले होते. मायक्रोसॉफ्टच्या या ड्युअल स्क्रीन फोनची सुरुवातीची किंमत १३९९ डॉलर्स (जवळपास १.०४ लाख रुपये) असेल. फोनच्या किंमतीची माहिती मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे. मात्र फोनच्या ग्लोबल लॉंचिंगबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

फोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर कंपनीने फीचर्सचा अधिकृतरित्या खुलासा केलेला नाही. पंरतू लीक झालेल्या रिपोर्टनुसार, सर्फेस ड्युओमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर असेल. याशिवाय फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळू शकते. या फोनमध्ये ११ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा असेल. म्हणजे रिअर आणि फ्रंटसाठी एकच कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, या फोनमध्ये ५.६ इंच एमोलेड डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझॉल्यूशन १८०० × १३५० पिक्सल असेल. डिस्प्लेची पिक्सल डेंसिटी ४०१पीपीआई असेल. फोनच्या डिस्प्लेला कोणत्याही अँगलने फिरवता येईल. फोनमध्ये अँड्रॉईड १० मिळेल. सोबतच ३४६० mAh बॅटरी आणि ४जी एलटीई सपोर्ट सोबत हा फोन लॉंच केला जावू शकतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com