Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याया भारतीय कंपनीने लॉन्च केले दोन कमी बजेटचे फोन

या भारतीय कंपनीने लॉन्च केले दोन कमी बजेटचे फोन

नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनाला प्रतिसाद देत चिनी मोबाइल कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने आज पुनरागमन केले. स्पर्धेत उतरण्यासाठी कमी किमतीत अधिक फिचर असणारे दोन प्रकारातील फोन लॉन्च केले.

- Advertisement -

‘चिनी कम’ करण्यासाठी मायक्रोमॅक्स इन नोट वन (in note 1) आणि मायक्रोमॅक्स इन वन बी (Micromax In 1B) असे दोन मोबाइल मंगळवारी लाँच केले आहे. मोबाइल लाँचिग सोहळा कंपनीच्या वेबसाइटवरुन लाइव्ह केला.

Micromax In Note 1 और Micromax In 1B या दोन्ही फोनचे मीडियाटेक प्रोसेसर आहे. तसेच 5000mAh बॅटरी तसेच रिवर्स चार्जिंगसोबत दिले आहे. कंपनीने Micromax In Note 1 दोन प्रकारात आणले आहे. 4GB रॅम 64GB स्टोरेज फोनची किंमत 10,999 रुपये आहे. 4GB रॅम व 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत 12,499 रुपये आहे.

Micromax In 1B मध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आहे. त्याची किंमत 7,999 रुपये आहेत. 2 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज असणारे फोनची किमत 6,999 रुपये आहे. दोन्ही डिवाइसेज फ्लिपकार्ट व माइक्रोमॅक्सच्या ऑफिशल साइटवरुन २४ नोव्हेंबरपासून मिळणार आहे.

कंपनी मागील काही दिवसांपासून अधिकृत फेसबुक पेजवरुन मोबाइल संदर्भात टिझ पोस्ट टाकून लाँचिंग सोहळ्याचे सातत्याने प्रमोशन करत आहे. यात फोटो, व्हिडीओ यांचा समावेश आहे. नवनव्या फेसबुक पोस्टद्वारे कंपनी लाँच होणार असलेल्या मोबाइल संदर्भातल्या चर्चेला नवे मुद्दे पुरवत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या