जिओची आता ‘5-G’ची तयारी

क्वालकॉमनच्या रूपाने रिलायन्स जिओला मिळाला १२ वा भागीदार
जिओची आता ‘5-G’ची तयारी

मुंबई - Mumbai

गलवान प्रकरणानंतर केंद्र सरकारने चीन कंपन्यांना हद्दपार करण्याची भूमिका घेतली आहे. सर्वात वेगवान इंटरनेट म्हणून सिद्ध झालेल्या फाईव्ह-जी (५-जी) मधील चीनी कंपनी हुवेईला दणका दिल्यानंतर या क्षेत्रात जिओने नशीब आजमावण्याची तयारी सुरू केली आहे. जिओने याकरिता क्वालकॉम या कंपनीला भागीदार केले आहे.

रिलायन्स जिओ प्लॅफॉर्ममध्ये क्वालकॉमने ७३० कोटींची गुंतवणूक केली आहे. जिओतील ०.१५ हिस्सेदारी क्वालकॉम खरेदी करणार आहे. क्वालकॉमनच्या रूपाने रिलायन्स जिओला १२ वा भागीदार मिळाला आहे. तर रिलायन्सने आतापर्यंत जिओमधील २५.२४ टक्के हिस्सा विक्री केला आहे. ज्यातून कंपनीने ११८३१८.४५ कोटी उभारले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या जिओ प्लॅटफर्ममधील क्वालकॉमने ०.१५ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. याआधी शनिवारी कंपनीने एल.कॅटरटोन, दि पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड, सिल्वर लेक आणि जनरल अँटलांटिक या चार गुंतवणूकदारांना हिस्सा विक्री केला. मागील तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या निधी उभारणीने रिलायन्स जिओचे इक्विटी मूल्य ४.९१ लाख कोटी आणि कंपनीचे मूल्य ५.१६ लाख कोटी झाले आहे.

क्वालकॉमच्या गुंतवणुकीबाबत रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये क्वालकॉमचे निर्विवाद वर्चस्व आहे. भारतात डिजिटल क्रांती आणि ५ जी सेवेला चालना देण्यासाठी क्वालकॉमसारखा भागीदार नक्कीच फयदेशीर ठरेल, असे अंबानी यांनी सांगितले.

जिओतील गुंतवणुकीची सुरूवात २२ एप्रिल रोजी फेसबुक सोबतच्या करारातून झाली. फेसबुकने ४३ हजार ५७३ कोटी मोजून ९.९९ टक्के हिस्सा विकत घेतला. त्यानंतर जिओत गुंतवणूक करणा-यांची रांग लागली. नंतर सिल्चर लेकने ७५० मिलियन डॉलरला आणि विस्टा इक्विटीने १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com