इन्स्टाग्राम आणणार दोन भन्नाट फीचर्स; जाणून घ्या वैशिष्ट्ये

इन्स्टाग्राम आणणार दोन भन्नाट फीचर्स; जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

इन्स्टाग्रामने (Instagram) एका नव्या फीचरची (Feature) टेस्टिंग सुरु केली आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर बराच वेळ घालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आहे. इन्स्टाग्रामने आता ‘टेक अ ब्रेक’ (Take a Break) या फीचरची चाचपणी सुरु केली आहे...

काय आहे टेक अ ब्रेक फीचर?

या फीचरच्या माध्यमातून इन्स्टाग्राम यूजर्स ठराविक वेळ घालवल्यानंतर त्यातून बॅक घेऊ शकतात. कंपनीने याबाबत नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. यात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानुसार या फीचरच्या माध्यमातून तीन टाईम स्लॉट ठेवण्यात आले आहेत. यात 10 मिनिटे, 20 मिनिटे, आणि 30 मिनिटांचा समावेश असणार आहे.

सेटिंग्जमध्ये जाऊन यापैकी कोणताही टाईम स्लॉट निवडता येणार आहे. हा टाईम स्लॉट निवडल्यानंतर इन्स्टाग्राम वापरताना तुमच्या स्क्रीनवर ब्रेक घेण्यास सांगणारी एक सूचना येणार आहे. यानंतर तुम्ही हो करून ब्रेक घेऊ शकता. हे फीचर बाय डिफॉल्ट येणार नाही असे कंपनीचे म्हणणे आहे. लोकांना ते सेट करावे लागणार आहे. जर एखाद्या वापरकर्त्याला ते वापरायचे नसेल तर त्याला ऑफचा पर्याय निवडावा लागेल.

सब्सक्रिप्शन फीचर

दरम्यान इन्स्टाग्रामवरून युजर्स प्रामुख्याने शॉर्ट व्हिडिओ म्हणजेच रील्स (Insta Reels) शेअर करतात. या माध्यमातून कंटेट क्रिएटर्स (Content Creators), एन्फ्लुएन्सर्स कमाईदेखील करतात.

सध्या इन्स्टाग्राम विनाशुल्क वापरता येत आहे. मात्र लवकरच इन्स्टाग्रामसाठी पैसे मोजावे लागण्यार आहे. आता कंपनी सब्सक्रिप्शन फीचरवर (Subscription Feature) काम करत आहे.

क्रिएटर्स, एन्फ्लुएन्सर्सना होणार फायदा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पसंती असलेल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटसाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागू शकतात. या फिचरच्या माध्यमातून कंटेट अॅक्सेस (Content Access) करण्यासाठी युझर्सना दरमहा 89 रुपये मोजावे लागणार आहेत. याचा इन्स्टाग्राम क्रिएटर्स आणि एन्फ्लुएन्सर्सना फायदा होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

सब्सक्रिप्शन घेतल्यानंतरच इन्स्टाग्राम युजर्स त्यांच्या आवडीच्या क्रिएटर्सचा कंटेट पाहू शकणार आहेत. जो इन्स्टाग्राम युजर 89 रुपये देऊन सब्सक्रिप्शन घेईल. त्याला एक बॅच देण्यात येणार आहे. युझरने कमेंट किंवा मेसेज केला तर त्याच्या युजरनेमसमोर हा बॅच दिसेल. म्हणजेच युझरला सब्सक्रिप्शन घेतलेला युजर अशी ओळख प्राप्त होणार आहे. सब्सक्रिप्शननंतर क्रिएटर्सना मिळणारे उत्पन्न आणि मेंबरशिप संपण्याविषयीचा तपशीलदेखील दिसणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com