Friday, April 26, 2024
HomeUncategorizedइन्स्टाग्रामवर करा भन्नाट व्हिडिओ

इन्स्टाग्रामवर करा भन्नाट व्हिडिओ

फेसबुकमधून करा, ५० जणांना व्हिडिओ काँलीग

मुंबई – Mumbai

- Advertisement -

भारताने ५९ चिनी ऍपवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली. यानंतर इन्स्टाग्रामसारख्या सोशलसाईटस सुद्धा भन्नाट फीचर्स घेऊन आल्या आहे. टिक टॉक बंद झाल्यावर चिंगारीसारख्या ऍपकडे टिकटॉकर्स वळले होते. पण आता टिकटॉक सारखे व्हिडीओ करता येणार आहेत इन्स्टाग्रामवर. होय, इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये हे नवं फीचर आलंय!

यासाठी युजर्सना ऍपमध्ये हे अपडेट करावं लागेल आणि इन्स्टाग्रामच्यास्टोरी मध्ये एक नवं फीचर आलेलं दिसेल! यामध्ये अगदी टिकटॉकसारखे छोटे व्हिडीओ, गाणी तसेच व्हिडीओची गती अर्थात स्लो मोशन, फास्ट फॉरवर्ड, टायमर ते फिल्टर्स आणि व्हिडीओसोबत जोडता येण्यासाठी म्युजिकही युजर्सच्या आवडीनुसार लावता येणार आहे.

टिकटॉकचे चाहते क्रिएटर वर्ग ऍपवर बंदी घातण्याने नाराज झाले पण इन्स्टाग्रामने आणलेल्या या फीचरमध्ये ते सगळं करता येणार आहे जे पूर्वी टिकटॉक वर करता यायचं. यामुळे युजर्स, क्रिएटर्स यांच्यामध्ये या नव्या फीचर बद्दल उत्सुकता दिसून येत आहे!

- Advertisment -

ताज्या बातम्या