भारतीय वापरकर्त्यांना वापरता येणार ‘हे’  फीचर
गॅजेट

भारतीय वापरकर्त्यांना वापरता येणार ‘हे’ फीचर

ऑनलाईन तयार करता येणार व्हिझीटिंग कार्ड

Rajendra Patil

नवी दिल्ली -New Delhi

भारतीय वापरकर्त्यांसाठी गुगलने खास फीचर सुरू केल्याची घोषणा केली आहे. वापरकर्त्यांना ऑनलाईन व्हिझीटिंग कार्ड तयार करता येणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना व्यवसाय व इतर माहिती देणे सहजशक्य होणार आहे.

ऑनलाईन व्हिझीटिंग कार्डचे फीचर हे ‘पीपल कार्ड’ नावाने सुरू केले आहे. या फीचरची गेली दोन वर्षे गुगलकडून चाचणी सुरू होती. पीपल कार्डमधून वापरकर्त्यांना त्यांची वेबसाईट आणि समाज माध्यमांचे प्रोफाईल शेअर करता येणार आहे. हे ऑनलाईन व्हिझीटिंग कार्ड ऑनलाईन सर्चमध्ये दिसू शकणार असल्याचे गुगल सर्चचे उत्पादन व्यवस्थापक लॉरेन क्लार्क यांनी सांगितले. लक्षावधी लोकांना या पीपल्स कार्डचा वापर करता येणार आहे.

असे तयार कराल पीपल कार्ड

तुमच्या गुगल अकाउंटवरून लॉग इन करा. त्याध्ये अॅड मी टू सर्च हा पर्याय निवडा. त्यामध्ये वापरकर्त्याला माहिती आणि इतर माहिती, वेबसाईट आणि सोशल मीडियाची लिंक देता येणार आहे. मात्र, हे व्हिझीटिंग कार्ड तयार करण्याचा व दिसण्याचा पर्याय केवळ मोबाईल फोनमधून उपलब्ध होणार आहे. पीपल कार्ड अथवा ऑनलाईन व्हिझीटिंग कार्डमधील माहितीत वापरकर्त्याला हवा तेव्हा बदल करता येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com