Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसावधान! व्हॉट्सॲप चॅटिंगचा स्क्रीनशॉट काढाल तर जाणार नोटीफिकेशन

सावधान! व्हॉट्सॲप चॅटिंगचा स्क्रीनशॉट काढाल तर जाणार नोटीफिकेशन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

मागील काही दिवसांपासून युजर्सची माहिती चोरून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप (Whatsapp) नवीन फिचर्सच्या (New Feature) माध्यमातून युजर्सची प्रायव्हसी (Privacy) जपण्यासाठी प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

आता युजर्सच्या सुरक्षेसाठी व्हॉट्सॲप पुन्हा एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या माध्यमातून दोन युजर्स व्हॉट्सॲपवर चॅटिंग (Chatting) करत असताना एका युजरने जर स्क्रीन शॉट (Screenshot) काढला तर व्हॉट्सॲप दुसऱ्या युजरला त्याबाबत माहिती देईल. यासंबंधित नोटीफिकेशन (Notification) युजरला मिळणार आहे.

हे फिचर्स उपलब्ध झाल्यास जगातील कोट्यवधी युजर्सला याचा निश्चितच फायदा होईल. व्हॉट्सॲपने या फिचरवर अनेक दिवसांपूर्वीच काम सुरु केले आहे. या फिचरचा उद्देश युजरची प्राईव्हसी (Privacy) जपणे हा आहे. जेव्हा एखादा व्यक्ती स्क्रीनशॉट काढते. त्याचवेळी व्हॉट्सॲप त्याला नोटिफिकेशनद्वारे स्क्रीनशॉट काढल्याची माहिती देईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या