Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऑनलाइन फसवणूक झाल्यास काय कराल? वाचा सविस्तर

ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय कराल? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

सध्या ऑनलाईन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे ऑनलाईन फ्रॉड्सचे प्रमाणदेखील वाढले आहे. युजर्सने सर्व ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक आहे…

- Advertisement -

डिजिटल पेमेंट फ्रॉड रिपोर्ट करण्याचा पर्याय सर्व यूपीआय बेस्ड अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. जर हा ऑप्शन अ‍ॅपमध्ये व्हिजीबल नसेल, तर युजर्स हेल्प अॅण्ड सपोर्ट सेक्शनमध्ये जाऊन याबाबत तपासणी करता येते. पेटीएम अ‍ॅपवर युजर्स अशा फ्रॉडला रिपोर्ट करू शकतात.

कसे कराल रिपोर्ट

  • प्रोफाईल सेक्शनवर टॅप करा आणि Help and Support सेक्शनमध्ये जा.

  • Choose a service you need help with या पर्यायावर टॅप करा आणि View all services क्लिक करा.

  • Report fraud and transactions बॉक्सवर क्लिक करा.

  • इश्यू सिलेक्ट करा आणि येथे युजर्स त्यांच्या प्रोब्लेमबद्दल सांगू शकतात. फिशिंग साईट, फ्रॉड ट्रान्झेक्शन किंवा इतर कोणतीही समस्यांबद्दल सांगता येते.

  • युजर्सनी सांगितलेल्या फ्रॉडबाबत कंपनीकडून तपास होऊन योग्य ती अ‍ॅक्शन घेतली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या