मोबाईल गहाळ झाला तरी संपर्क क्रमांक मिळवण्याच्या साध्या, सोप्या टिप्स

मोबाईल गहाळ झाला तरी संपर्क क्रमांक मिळवण्याच्या साध्या, सोप्या टिप्स

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आपला मोबाईल फोन (Mobile Phone) खराब किंवा हरवला असल्यास त्या फोनमधील कॉन्टॅक्ट नंबर (Contact Numbers) परत मिळवणे कठीण जाते. काही सोप्या पद्धतींचा वापर करून ही परिस्थिती टाळता येऊन तुम्ही पुन्हा फोन नंबर्स रिस्टोर (Restore) करू शकता. तर जाऊन घ्या ही सोपी पद्धत...

कॉन्टॅक्ट नंबर्स रिकव्हर (Contact Numbers Recover) करण्यासाठी तुमचे जीमेल अकाउंट (Gmail Account) असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे जीमेल अकाउंटच नसेल, तर जीमेल अकाउंट बनवा. नंतर तुमच्या फोनमध्ये ते Gmail अकाउंट लॉगइन करा.

तुन्हाला तुमचे Gmail अकाउंट सतत सिंक (Sync) करत राहावे लागेल. यामुळे जो नंबर तुम्ही फोनमध्ये सेव्ह कराल, तो रियल टाईममध्ये (Real time) अपडेट (Update) होत राहील. यासाठी तुम्हाला फोन सेटिंगमध्ये (Phone settings) जावे लागेल.

नंतर Contact Backup हा पर्याय ऑन करावा लागेल. सेटींग्समध्ये (Settings) Account and Sync पर्यायावर क्लिक करा. तुमचे जीमेल अकाउंट अॅक्टिव्हेट (Activate) करा. तुमच्या फोनमधील सर्व नंबर्स आपोआप जीमेलवर बॅकअप (Backup) होतील.

तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट (Contact list) पाहण्यासाठी गुगलच्या (Google) होम पेजवर (home page) उजव्या बाजूला असलेल्या Gmail जवळील Contacts ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर स्क्रीनवर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर दिसतील. या सर्व नंबर्सचा बॅकअपदेखील घेता येतो. येथे तुम्हाला नको असलेले कॉन्टॅक्ट नंबर डिलिट (Delete) करण्यासाठी पर्याय उपलब्ध असतो.

ही पद्धत वापरल्यास तुमचे contact numbers कधीच तुमच्याकडून गहाळ होणार नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com