मोबाइलची बॅटरी दीर्घकाळ चालण्यासाठी वाचा या टिप्स

मोबाइलची बॅटरी दीर्घकाळ चालण्यासाठी वाचा या टिप्स

पुर्वीचे नोकिया कंपनीचे जुने मोबाइल एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तीन ते चार दिवसही चालायचे, पण विविध अ‍ॅप्स आणि समाजमाध्यमांमुळे स्मार्टफोनचा वापर आता वाढत आहे, त्यामुळे बॅटरी लवकर संपण्याचा अनुभव प्रत्येकालाच येतो. मोबाइलची चार्जिग लवकर संपणे, चार्ज होण्यासाठी वेळ लागणे यासारख्या अनेक अडचणी युजर्सना येतात. मोबाइलच्या बॅटरीची योग्य काळजी घेतली आणि काही सोप्या टिप्स फॉलो केल्या, तर या अडचणी येणार नाहीत. अशाच काही टिप्स..

Title Name
IPL रद्द आता पुढे काय ? कधी होणार स्पर्धा ?
मोबाइलची बॅटरी दीर्घकाळ चालण्यासाठी वाचा या टिप्स

जीपीएस ठेवा बंद

मोबाइलमधील बॅटरीचा सर्वाधिक वापर ‘जीपीएस’ यंत्रणेकडून केला जातो. यामुळे जीपीएसचा वापर नसेल तेव्हा जीपीएस बंद करा. यामुळे मोबाइलची बॅटरी किमान दोन-तीन तास जास्त कार्यरत राहू शकते.

मोबाइल डेटाकडे द्या लक्ष

इंटरनेटमुळेही बॅटरी मोठय़ा प्रमाणात वापरली जाते. आपल्याकडे अजूनही नेटवर्क चांगल्या दर्जाचे नाही. यामुळे सिग्नल पकडण्यासाठी स्मार्टफोनला जास्त शक्ती खर्च करावी लागते. साहजिकच त्यासाठी बॅटरीचा अधिक वापर होतो व ती लवकर संपते. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा वायफायचा वापर करा. घरी किंवा कार्यालयात असताना वायफाय वापरा.

स्क्रीन ब्राइटनेसकडे ठेवा लक्ष

स्क्रीन ‘ब्राइटनेस’ जितका जास्त तितक्या जास्त वेगाने बॅटरी संपते. यामुळे स्मार्टफोनचा ब्राइटनेस नेहमी ‘ऑटो मोड’वरच ठेवा. या मोडमध्ये सभोवतालच्या प्रकाशानुसार स्मार्टफोनचा ब्राईटनेस आपोआप बदलतो. त्यामुळे बॅटरीही योग्यरीत्या वापरली जाते. काही फोनमध्ये आउटडोअर, नाईट मोड, डार्क रूम असेही पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून ब्राईटनेस योग्य पद्धतीने सेट करता येतो.

रात्रभर चार्जिग करु नका

मोबाइल कधीही रात्रभर चार्जिगला लावून ठेवू नका. अनेकजण मोबाइल चार्जिगला लावून झोपतात. त्यामुळे मोबाइल गरम होतो आणि सातत्याने असे होत राहिल्यास त्याचा परिणाम मोबाइलवर होण्याची शक्यता असते.

कंपनीच्याच चार्जरने चार्ज करा

मोबाइल नेहमी त्या-त्या कंपनीच्याच चार्जरने चार्ज करा. अन्य चार्जर वापरल्यामुळे फोन हळूहळू चार्ज होतोच, शिवाय बॅटरीला धोका निर्माण होतो.

चार्जिग करताना मोबाइल वापरु नका

मोबाइल चार्ज करता करता फोनवर अजिबात बोलू नका. स्पीकर फोन ऑन करूनही बोलू नका. शिवाय चार्जिग करताना मोबाइलवर व्हिडीओ बघणे किंवा गेम खेळणेही टाळा. यामुळे चार्जिगला वेळ लागतो. काहीवेळा फोन गरम होऊ शकतो. चार्जिगला लावल्यानंतर मोबाइल गरम होत असेल तर संबंधित मोबाइल कंपनीच्या सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासून घ्या. त्यामुळे बॅटरीला नुकसान होऊ शकते.

नोटिफिकेशन्सवर नजर

आपल्या मोबाईलमधील बरेच अ‍ॅप्स सुरूच असतात. त्यांची नोटिफिकेशन्सही येत असतात. बॅकग्राऊंडमध्ये सतत प्रोसेस सुरू राहते. त्यासाठी बॅटरीचा वापर होत राहतो. यामुळे ‘नोटिफिकेशन’चा पर्याय बंद ठेवा. ‘फेसबुक लाइट’हे अ‍ॅपदेखील वापरू शकता. हे अ‍ॅप फेसबुकसारखंच असते. पण ते डेटा आणि बॅटरी कमी वापरते.अनेकदा काम नसणारे अ‍ॅप आपण इन्स्टॉल करतो. हे अ‍ॅप आपल्या नकळत फोनची बॅटरी वापरतात. यामुळे सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमधील अनावश्यक आणि जास्त बॅटरी वापरणारी अ‍ॅप काढून टाका. कोणते अ‍ॅप जास्त बॅटरी वापरत आहे, हे सहज कळू शकते. त्यासाठी मोबाइलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन बॅटरी या पर्यायावर क्लिक करा.

सार्वजनिक ठिकाणी चार्जिग नको

स्मार्टफोनला सार्वजनिक ठिकाणी चार्ज करताना सावधानता न बाळगल्यास महत्त्वाचा डेटा चोरीस जाऊ शकतो.बस, रेल्वेस्टेशन, विमानतळ अशा आणि इतर अनेक सार्वजनिक जागांवरील चार्जिग पॉइंटवर आपला मोबाइल अनेक जण चार्ज करतात. पण, त्यानंतर अनेकांचे मोबाइल स्लो किंवा हँग होतात. हे सर्व प्रकार ‘ज्यूस जॅकिंग’मुळे झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवासात स्वतचा चार्जर बाळगला पाहिजे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com