गुगलचे हे लोकप्रिय ॲप होणार बंद
गॅजेट

गुगलचे हे लोकप्रिय ॲप होणार बंद

Ramsing Pardeshi

नवी दिल्ली - New Delhi

जर तुम्ही देखील गाणी ऐकण्यासाठी गुगलचे म्यूझिक ॲप गुगल प्ले-म्यूझिक ॲप वापरत असाल, तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. गुगल लवकरच आपले हे म्यूझिक ॲप बंद करणार आहे. गुगलने या संदर्भात माहिती आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे. गुगलने माहिती दिली की गुगल प्ले म्यूझिक ॲपच्या सर्व युजर्सला यानंतर युट्यूब म्यूझिकवर शिफ्ट केले जाईल. मागील काही महिन्यांपासून गुगल युट्यूब म्यूझिक ॲपसाठी नवनवीन फीचर जारी करत आहे.

युट्यूब म्यूझिक ॲपवर शिफ्ट झाल्यानंतर याच ठिकाणी युजर्सला गुगल प्ले म्यूझिक ॲपची प्लेलिस्ट, लायब्ररी आणि म्यूझिक मिळेल. गुगल प्ले- म्यूझिकला ऑॅक्टोंबर २०२० नंतर कोणतेही अपडेट मिळणार नाही. तर डिसेंबर २०२० पर्यंत युजर्सला युट्यूब म्यूझिक ॲपवर शिफ्ट करण्याची प्रक्रिया पुर्ण होईल.

सप्टेंबर महिन्यापासून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे युजर्स या ॲपचा वापर करू शकणार नाहीत. तर ऑॅक्टोंबरपासून जगभरात हे ॲप बंद होईल. गुगल युट्यूब म्यूझिकवर नवनवीन ङ्गीचर देऊन युजर्सला आकर्षित करत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com