प्रतीक्षा संपली! गुगलचे नवीन स्मार्टफोन ‘या’ दिवशी बाजारात

प्रतीक्षा संपली! गुगलचे नवीन स्मार्टफोन ‘या’ दिवशी बाजारात
Pixel 6 Pro

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गुगलच्या पिक्सेल 6 (Google Pixel 6) सीरिजमधील नवीन स्मार्टफोन या महिन्यात लॉन्च होणार आहे. गुगल कंपनीने पिक्सेल 6 (Pixel 6) आणि पिक्सेल 6 प्रो (Pixel 6 Pro) स्मार्टफोन्सच्या लाँचिंगची अधिकृत लॉन्चची घोषणा केली आहे...

हा स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी कंपनी 'पिक्सेल फॉल लाँच' हा कार्यक्रम घेणार आहे. दि. 19 ऑक्टोबरला हे फोन लॉन्च होणार आहेत. भारतात 19 ऑक्टोबरला रात्री 10 वाजून 30 मिनिटांपासून हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

फोनची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

  • उत्तम दर्जाचा कॅमेरा.

  • 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड, 48 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा.

  • गुगल AL/ML सेन्सरचे आऊटपूट.

  • पिक्सेल 6 मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.4-इंच फुल एचडी प्लस (FHD+) AMOLED डिस्प्ले.

  • पिक्सेल 6 प्रो मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंच क्यूएचडी प्लस (QHD+) AMOLED डिस्प्ले.

  • दोन्ही स्मार्टफोनला पंच-होल डिस्प्ले डिझाइन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर.

अलीकडेच गुगलने आपली अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम 12 लॉन्च केली आहे. ही सिस्टीम वेगवेगळ्या फोनवर आणण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना गुगलच्या नव्या स्मार्टफोनची खूप दिवसांपासून प्रतिक्षा होती.

आता हे फोन 19 ऑक्टोबरला लॉन्च होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे ही प्रतीक्षा संपली आहे. या फोनला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पिक्सेल 6 सीरिजच्या फोनमध्ये एक विशेष गोष्टदेखील असणार आहे, ती म्हणजे गुगलने स्वतः तयार केलेली टेन्सर चिप (Tensor chip) या फोनमध्ये वापरली जाईल. या चिपमुळे फोन वापरताना युजर्सना वेगवान आणि सुरक्षित (Fast & Secure) अनुभव मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Related Stories

No stories found.