Friday, April 26, 2024
HomeUncategorizedगुगल लॉन्च करणार खिशाला परवडणारा स्मार्टफोन

गुगल लॉन्च करणार खिशाला परवडणारा स्मार्टफोन

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध सर्च इंजिन गुगल लवकरच समान्यांच्या खिशाला परवडणारा स्मार्ट फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

- Advertisement -

गुगलने कंपनी जिओ सोबत हातमिळवणी केली असून खिशाला परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन तयार करणार आहोत, अशी सुंदर पिचाई यांनी केली आहे. गेल्या वर्षात गुगलने ३३,७३७ कोटी रुपयांचा जिओ च्या प्लॅटफॉर्ममध्ये ७.७ टक्के हिस्सा खरेदी केला होता. त्याचसोबत दोन दिग्गज कंपन्यांनी एक कर्शिअल अॅग्रीमेंट सुद्धा केले होते. त्यानुसार एक एन्ट्री लेव्हल अफोर्डेबल स्मार्टफोन तयार करण्याचा करार झाला होता.

सुंदर पिचाई यांनी एशिया पॅसिफिकच्या निवडक रिपोर्ट्सह वर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटले की, आम्ही एक स्मार्टफोन तयार करण्याचा विचारात आहोत.

या स्मार्ट फोन बाबत अद्याप अतिरिक्त माहिती दिलेली नसल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र कंपनीने कंन्फर्म केले की फोन स्वस्त किंमतीत असणार आहे. यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहचवण्यास मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या