Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedनोकरी शोधणारांसाठी गुगलने लॉंच केले खास ॲप

नोकरी शोधणारांसाठी गुगलने लॉंच केले खास ॲप

नवी दिल्ली – New Delhi

गुगलने (google) आपले जॉब लिस्टिंग ॲप कोर्मो जॉब्सला (Kormo Jobs) अखेर भारतात लॉंच केले आहे. याआधी कंपनीने या ॲपला बांगलादेश आणि इंडोनेशियामध्ये लॉंच केले होते. हे ॲप वेगवेगळ्या प्रकारच्या नोकर्‍यांची यादी उमेदवारांना दाखवते. याशिवाय प्रत्येकजण या प्लॅटफॉर्मवर स्वत:चा डिजिटिल सीव्ही तयार करू शकतात. गुगलचे हे ॲप लाखो लोकांना नोकरी देण्यास मदत करेल. गुगलचे हे जॉब लिस्टिंग ॲप लिंक्डइन (LinkedIn), नोकरी.कॉम आणि टाईम्सजॉब्सला ((TimesJobs)) टक्कर देईल.

- Advertisement -

कोर्मो जॉब्स ॲपच्या मदतीने तुम्ही प्रोफाईलच्या आधारावर नोकरी शोधू शकता. याशिवाय यात दिलेल्या काही टूल्सद्वारे प्रोफाईलमध्ये करिअर आणि नवीन स्किलला अपग्रेड करू शकता. यात डिजिटल सीव्ही तयार करून तो शेअर आणि प्रिंट देखील करता येईल. गुगलने मागील वर्षी गुगल पे ॲपमध्ये (google pay app) जॉब्स स्पॉट सेक्शन देखील दिले होते. आता याचेच नामकरण करत कंपनीने कोर्मो जॉब्सचे सेक्शन दिले आहे.

गुगल पे वरील जॉब स्पॉटला खासकरून एंट्री लेव्हल नोकरीसाठी डिझाईन करण्यात आले होते. मात्र कोर्मो जॉब्स अधिक नोकर्‍या दर्शवेल. एप्रिल २०१८ मध्ये गुगलने सर्च इंजिनवर जॉब लिस्टिंगसाठी आसानजॉब्स, फ्रेशर्सवर्ल्ड, (FreshersWorld) आयबीएम टॅलेंट मॅनेजमेंट सोल्यूशन्स,(IBM Talent Management Solutions) लिंक्डइन, क्यूझेएक्स आणि शाईन (QZX and Shine) सारख्या जॉब पोर्टल्सशी भागीदारी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या