Saturday, April 27, 2024
HomeUncategorized...यामुळे गुगल ड्राइव्ह होणार अधिक सुरक्षित

…यामुळे गुगल ड्राइव्ह होणार अधिक सुरक्षित

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गुगल ड्राइव्हमध्ये (Google Drive) एक सिक्युरिटी अपडेट (Security Update) लवकरच येणार आहे. गुगल ड्राइव्हद्वारे फाइल शेअरिंग (File Sharing) अधिक सुरक्षित होण्यासाठी हा अपडेट (Update) करणार असल्याचे गुगलने (Google) सांगितले आहे. येत्या काही दिवसात गुगलकडून याबाबत अधिक माहिती युझर्सला दिली जाणार आहे…

- Advertisement -

यामुळे काही फाइल्सच्या लिंक्समध्ये (Links) बदल होणार आहेत. त्यामुळे संबंधित फाइल्सकरिता नव्याने अ‍ॅक्सेस रिक्वेस्ट (Access Request) स्वीकाराव्या अथवा द्याव्या लागतील, असे गुगलने स्पष्ट केले आहे.

सध्या गुगल ड्राइव्हला लॉगिन (Google Drive login) केल्यानंतर सिक्युरिटी अपडेटबद्दलचा बॅनर अनेक युझर्सला दिसत आहेत. या अपडेटमुळे ज्या फाइल्समध्ये बदल होतील त्याची यादीदेखील दिसत आहे. हा सिक्युरिटी अपडेट लागू करायचा की नाही, याचा निर्णय युझर्सला घेता येणार आहे.

सिक्युरिटी अपडेट स्वीकारल्यानंतर फाइल्सच्या लिंक्स अपडेट होतील आणि रिसोर्स कीचादेखील (Resource Key) त्यात समावेश असणार आहे. हा अपडेट न स्वीकारण्याचा पर्याय जरी उपलब्ध असला तरी त्याची शिफारस केली जात नाही.

या बदलाचे नोटिफिकेशन (Notification) पाहण्यासाठी गुगल ड्राइव्ह वेब ब्राउजरमध्ये ओपन करावे. नंतर विंडोच्या सर्वांत वरच्या भागात असलेला बॅनर पाहा. त्यातल्या ‘See files’ या पर्यायावर क्लिक करा.

या अपडेटमुळे ज्यांच्या लिंक्स बदलणार आहेत, त्या फाइल्सची यादी दिसेल. त्या फाइल्स ज्यांच्याशी शेअर (Share) केलेल्या आहेत, त्यांनी आधीच त्या पाहिलेल्या असतील, तर त्यांना त्या फाइल्सचा अ‍ॅक्सेस (Files access) कायम राहणार आहे. अन्य युझर्सला त्या अ‍ॅक्सेससाठी कदाचित पुन्हा रिक्वेस्ट (Request) पाठवावी लागू शकते.

13 सप्टेंबरपासून युझर्सच्या काही फाइल्सला सिक्युरिटी अपडेट लागू केला जाईल. पब्लिकली पोस्ट केलेल्या फाइल्सचा सिक्युरिटी अपडेट काढून टाकला जाऊ शकतो. ड्राइव्ह ऑन द वेब (Drive on the web), अ‍ॅपल (Apple) आणि अँड्रॉइड अ‍ॅप्स (Android apps) या सर्व प्लॅटफॉर्म्सवर हे नियम लागू असणार आहेत, अशी माहिती गुगलने दिली आहे.

हा अपडेट लागू करण्यासाठी युझर्सला काहीच करावे लागणार नाही. सिक्युरिटी अपडेट बॅनरमध्ये ‘Applied’ स्टेटस असलेल्या फाइल्स तुम्हाला दिसणार आहेत. तुम्हाला सिक्युरिटी अपडेट (Security update) नको असेल, तर प्रत्येक फाइलवर क्लिक करून ‘Remove Security Update’ यावर क्लिक करावे लागेल, असे गुगलने सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या