चीनचे हे अ‍ॅप गुगलनेच केले ‌बॅन

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई :

ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी गूगल प्ले स्टोरवरून(Google Play Store)आर्थिक व्यवहार करणारे ऍप डाऊनलोड केले असतील तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. चिनी सर्वरद्वारे अ‍ॅप स्टोरमध्ये सामिल असलेल्या ५ अ‍ॅप्सवर गूगलने बंदी घातली आहे.

गूगल प्ले स्टोरने k Cash, Go Cash, Flip Cash, ECash आणि SnapltLoan हे अॅप बॅन केले आहेत. आतापर्यंत हे अ‍ॅप्स १० लाख युजर्सने डाऊनलोड केले आहे. हे अ‍ॅप्स चालविण्यासाठी स्थानिक सरकारकडून मान्यता घेणे बंधनकारक असतांना तसे केले गेले नाही. या अ‍ॅपचा संबंध थेट चीनसोबत असल्याचा खुलासा देखील मिळाला आहे. अलिबाबा क्लाऊडच्या सर्व्हरवरून हे सर्व अ‍ॅप्स चालवण्यात येत होते. मात्र अद्यापही या ५ अ‍ॅप्सला ट्रेस करण्यात आलेले नाही. त्यामुळे तुम्ही Ok Cash, Go Cash, Flip Cash, ECash आणि SnapltLoan यांपैकी कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड केले असतील तर तात्काळ Uninstall करा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *