Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यागुगल, ॲपलने लाखो ॲप्स का केले बॅन? जाणून घ्या

गुगल, ॲपलने लाखो ॲप्स का केले बॅन? जाणून घ्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गुगलने (Google) आपल्या प्ले स्टोअरमधून (Play Store) आणि ॲपलने (Apple) ॲप स्टोअर (App Store) वरुन लाखो ॲप्स (Apps) बॅन केले आहेत. 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर 8 लाख 13 हजारहून अधिक ॲप्स हटवण्यात आले आहेत…

- Advertisement -

हे 8 लाख ॲप्स डिलिट करण्यापूर्वी गुगल प्ले स्टोअरवरुन 9 अब्ज वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत. ॲपलच्या ॲप स्टोरवरुन ॲप हटवले जाण्याआधी या ॲप्सला 2.1 कोटी कस्टमर रिव्ह्यूज आणि रेटिंग्स होते.

त्यामुळे ॲप्स स्टोअरवरुन हटवण्यात आल्यानंतरही लाखो युजर्सच्या स्मार्टफोनवर हे ॲप्स अद्यापदेखील उपलब्ध असण्याची शक्यता आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन 86 टक्के आणि ॲपल ॲप स्टोअरवरुन 89 टक्के मोबाइल अॅप्सने 12 वर्ष आणि त्याहून कमी वयोगटातील मुलांना टार्गेट केले होते.

यात 25 टक्के प्ले स्टोअर ॲप आणि 59 टक्के ॲपल स्टोअर ॲप्समध्ये कोणतीही प्रायव्हसी पॉलिसी नव्हती. जवळपास 66 टक्के गुगल ॲप्समध्ये कमीत-कमी एक धोकादायक परमिशन होती.

या धोकादायक परमिशनला रनटाइम परमिशन असेदेखील म्हणतात. यामुळे हे ॲप्स युजरच्या डेटापर्यंत सहजपणे पोहचतात. ज्याचा सिस्टम आणि इतर अॅप्सवर परिणाम होतो.

बॅन केलेल्या ॲप्सची थेट कॅमेरापर्यंत पोहोच होती. तसेच GPS कॉर्डिनेटही होते. गुगल प्ले स्टोअर ॲप्स डाउनलोड करण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित प्लेटफॉर्म मानले जाते. मात्र याच स्टोअरवर असेदेखील काही ॲप्स होते जे मोबाईलची सुरक्षा धोक्यात आणत होते.

या ॲप्सचा वापर हॅकर्स त्यांच्या खासगी फायद्यासाठी करत होते. त्यामुळेच गुगल आणि ॲपलने आपापल्या स्टोअर्सवरून हे धोकादायक ॲप्स डिलिट करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या