Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजियोनीचे ३ स्मार्टवॉच लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये

जियोनीचे ३ स्मार्टवॉच लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी दिल्ली | New Delhi

जियोनी कंपनीने भारतीय बाजारपेठेत 3 नवी स्मार्टवॉच लॉन्च केली आहेत. यात Stylfit GSW6, Stylfit GSW7 आणि Stylfit GSW 8 या मॉडेल्सचा समावेश आहे…

- Advertisement -

या स्मार्टवॉचमध्ये फिटनेस आणि हार्ट मॉनिटरिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टवॉच आयओएस आणि अँड्रॉईड डिव्हाईसला पेअर केले जाऊ शकतात. Stylfit GSW7 वगळता अन्य दोन स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथसह व्हॉईस कॉलिंगची सुविधादेखील देण्यात आली आहे.

Stylfit GSW6 ची वैशिष्ट्ये

  • चौकोनी आकाराचा डिस्प्ले

  • डिस्प्लेसाठी कव्हर्ड ग्लासचा वापर

  • ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी

  • व्हॉईस कॉलिंग आणि म्युझिक ऍक्सेस

  • मायक्रोफोन आणि इन-बिल्ट स्पीकर

  • 220mAh ची बॅटरी

  • 15 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप

  • Spo2 सेन्सर,

  • हार्ट रेट मॉनिटरिंग,

  • स्लीप मॉनिटरिंग

  • 40 पेक्षा अधिक वॉच फेसेस

Stylfit GSW7 ची वैशिष्ट्ये

  • 1.3 इंची गोल डिस्प्ले

  • IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट

  • फिटनेस मोड सपोर्ट

  • 130 mAh ची बॅटरी

  • 4 दिवसांपर्यंत बॅकअप

Gionee Stylfit GSW8 ची वैशिष्ट्ये

  • गोलाकार डिस्प्ले

  • 300 mAhची बॅटरी

  • 18 दिवसांपर्यंत बॅकअप

  • सायकल ट्रॅकिंग

  • कॅलरी काऊंटर

भारतात Gionee Stylfit GSW7 स्मार्टवॉचची किंमत 3999 रुपये आहे. जियोनी Stylfit GSW6 ची किंमत 6999 रुपये, तर Stylfit GSW8 या स्मार्टवॉचची किंमत 8999 रुपये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या