Saturday, April 27, 2024
HomeUncategorized'या' स्मार्ट टीव्हीवर तब्बल ४ हजार ५०० रुपयांची सूट

‘या’ स्मार्ट टीव्हीवर तब्बल ४ हजार ५०० रुपयांची सूट

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

स्मार्ट टिव्हीवर युट्युब, ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सला उपलब्ध होतात. त्यामुळे सध्या स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. शाओमीने आपल्या प्लॅटफॉर्मवर डे सेलचे आयोजन केले आहे. हा सेल ५ दिवसांचा असून त्याची अंतिम मुदत ८ जूनपर्यंत आहे. या सेलच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही घेण्यासाठी ग्राहकांना चांगली संधी आहे…

- Advertisement -

Mi TV 4A Horizon या सिरीजचा टीव्ही या सेलमध्ये १९ हजार ९९९ रुपयांऐवजी १५ हजार ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

या व्यवहारात ग्राहकांना टीव्हीच्या खरेदीवर एकूण ४ हजार ५०० रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. हा टीव्ही HD रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही आहे. या टीव्हीला 60Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. या टीव्हीत ग्राहकांना पॅचवॉल युजर इंटरफेस मिळेल. Mi TV Horizon एडीशनमध्ये शाओमीच्या Vivid Picture Engine चा समावेश आहे.

नव्या सीरिजमध्ये Mi QuickWake फिचर देण्यात आले आहे. यामुळे युजर आपला टीव्ही अत्यंत कमी वेळात सुरु करू शकतो. ऑडिओसाठी या सीरिजमध्ये 20W चा स्टिरीओ स्पीकर देण्यात आला आहे. हा स्पिकर DTS-HD ने सुसज्ज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या