'या' तारखेला लॉन्च होणार गेमिंग फोन POCO M2 !

या बाबतची माहिती POCO India ने ट्विटरद्वारे दिली आहे.
'या' तारखेला लॉन्च होणार गेमिंग फोन POCO M2 !

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी POCO जवळपास 10000 रुपये किमतीचा POCO M2 हा नवा फोन लवकरच लॉन्च करणार आहे. याबाबतची माहिती POCO India कंपनीने दिली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी POCO जवळपास 10000 रुपये किमतीचा POCO M2 हा नवा फोन लवकरच लॉन्च करणार आहे. याबाबतची माहिती POCO India कंपनीने दिली आहे. POCO M2 स्मार्टफोन येत्या 8 सप्टेंबरला भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार आहे. त्याचसोबत ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने सुद्धा अपकमिंग स्मार्टफोन POCO M2 चा टीझर लॉन्च केला आहे. मात्र कंपनीने अद्याप या फोनचे फीचर्स जाहीर केले नाहीत.

कंपनीने जुलैच्या सुरुवातील POCO M2 Pro स्मार्टफोन उतरवला होता. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम+64GB स्टोरेजच्या मॉडेलची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6GB रॅम+64GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6GB +128GB मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे.

POCO M2 Pro
POCO M2 Pro

POCO M2 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले दिला आहे. त्याचा रेजोल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. या स्मार्टफोनसाठी Snapdragon 720G प्रोसेसर दिला आहे. या व्यतिरिक्त युजर्सला डिवाईसमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल, 5MP चे मॅक्रो शूटर आणि 2MP चे डेप्थ सेंसर दिला आहे. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा दिला आहे.

POCO M2 Pro
POCO M2 Pro
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com