जुलैमध्ये लॉन्च होणार हे 'पाच' स्मार्टफोन; जाणून घ्या

जुलैमध्ये लॉन्च होणार हे 'पाच' स्मार्टफोन; जाणून घ्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

जुलैमध्ये विविध मोबाईल कंपन्या नवीन स्मार्टफोन लॉन्च (New smartphone launch) करणार आहेत. रियलमी (Realme), पोको (Poco), शाओमी (Xiaomi) या ब्रँडच्या नवीन सिरीजचे फोन युझर्स खरेदी करु शकतात. या महिन्यात कोणते ब्रँड (Mobile brands) नवीन फोन लॉन्च करण्याची तयारी करीत आहेत ते जाणून घ्या...

Xiaomi Redmi 10

सध्या शाओमी (Xiaomi) ब्रँड लोकप्रिय ठरत आहे. यामागचे कारण फोनच्या स्वस्त किमती असल्याचे समजते. शाओमी फोन या महिन्यात रेडमी 10 A आणि रेडमी 10 पॉवर लॉन्च करणार आहे. Redmi 10 ची ही नवीन बजेट स्मार्टफोन (Budget smartphone) सिरीज असेल. यात फोनमध्ये मीडियाटेक हीलिओ जी 35 सह 4 जीबी रॅम असणार आहे.

Poco X3 GT

Poco X3 GT मध्ये 3 रीअर कॅमेरे (Rear cameras) देण्यात आले आहेत. यात 64 मेगापिक्सलचा (Megapixels) प्रायमरी सेन्सर (Primary sensor), 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल (Ultra wide angle) आणि 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स (Micro lens) समाविष्ट आहे. सेल्फी कॅमेरा (Selfie camera) 16 एमपीचा (MP) आहे. यात 6 जीबी रॅम आहे, 128 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. हा फोन जुलैच्या शेवटी लॉन्च होऊ शकतो. यात Android 11 चे अपडेटेड व्हर्जन (Updated Version) देण्यात येईल.

Samsung Galaxy M52

Samsung Galaxy M52 या फोनमध्ये Android V11 व्हर्जन देण्यात येणार आहे. या फोनला 8 कोर (2.4 गीगाहर्ट्झ, सिंगल कोअर + 2.2 गीगाहर्ट्झ, ट्राय कोअर + 1.9 गीगाहर्ट्झ, क्वाड कोअर) तसेच स्नॅपड्रॅगन 778 जी प्रोसेसर देण्यात येणार आहे. 6 जीबी रॅम (RAM) आणि 128 जीबी स्टोरेज (Storage) आहे. 16 एमपी फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सरदेखील (Fingerprint sensor) देण्यात येणार आहे.

Poco F3 GT

Poco F3 GT हा फोन 25 जुलैपर्यंत भारतात (India) लॉन्च होण्याची शक्यता आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 चिपसेटसह 6.7 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यात 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रीअर कॅमेरा (Triple rear camera) आणि 5,065 एमएएचची बॅटरी (MAh battery) मिळेल.

Realme X9 सिरीज

Realme X9 फोन १५ जुलैपर्यंत लॉन्च होऊ शकतो. यात 6 जीबी रॅम, 6.4-इंच (16.26 सेमी) एएमओएलईडी डिस्प्ले दिला जाईल. एलईडी फ्लॅशसह कॅमेरा (LED flash camera) उपलब्ध आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (Front camera) मिळेल. 4300 एमएएचची बॅटरी, 128 जीबी स्टोरेज तसेच फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com