फेसबुक भारतात लॉंच करणार टीक-टॉक सारखे ‘शॉर्ट व्हिडीओ’ फीचर

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली – New Delhi

फेसबुक भारतात टीक-टॉकवरील बंदी आणि त्यानंतर अमेरिकेतील प्रस्तावित बंदीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्लॅटफॉर्म अंतर्गतच एक नवीन शॉर्ट व्हिडीओ फीचर आणण्याची तयारी करत आहे. या फीचरचे फेसबुककडून टेस्टिंग देखील सुरू आहे. हे नवीन फीचर न्यूज फीडच्या अगदी मधोमध दिसते व अगदी हुबेहुब टीक-टॉकप्रमाणेच आहे. काही दिवसांपुर्वीच फेसबुकने टीक-टॉकवर रिल्स नावाने शॉर्ट व्हिडीओ फीचर लॉंच केले आहे. आता कंपनीने फेसबुकवर नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे.

सोशल मीडिया युजर Matt Navarra ने सर्वात प्रथम या फीचरबाबत माहिती दिली. युजरने शेअर केलेल्या फोटोमध्ये फेसबुक शॉर्ट व्हिडीओ फीचरचे टेस्टिंग करत असल्याचे दिसत आहे. हे नवीन फीचर टीक-टॉक व्हिडीओ सारखेच आहेत, ज्यात पुढील व्हिडीओ पाहण्यासाठी स्वाइप-अप स्क्रॉल करावे लागते. सध्या फेसबुक भारतात या फीचरचे टेस्टिंग करत आहे.

फेसबुकच्या या फीचरचे इंटरफेस देखील टीक-टॉक प्रमाणेच आहे. ज्यात डाव्या बाजूला कमेंटस आणि लाईकीचा पर्याय आहे. म्यूझिक देखील वापरता येते. याशिवाय पॉज, रेकॉर्डचा देखील पर्याय टीक-टॉक सारखाच आहे. व्हिडीओ बनवल्यानंतर इन- अॅप शेअर करता येईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *