व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजी होणार अधिक आकर्षक; 'हे' नवीन फीचर येणार

व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजी होणार अधिक आकर्षक; 'हे' नवीन फीचर येणार

नवी दिल्ली | Mumbai | New Delhi

गेल्या काही वर्षांपासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दैनंदिन कामांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा अनेक लोक करतात. आता व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवीन फिचर लॉन्च (New feature launch) करणार आहे...

आजकाल व्हॉट्सअ‍ॅपमध्ये इमोजी (Emoji) वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅप आता नवनवीन इमोजी घेऊन येत आहे.

लेटेस्ट इमोजी पॅकचा (Latest Emoji Pack) समावेश करण्यास व्हॉट्सअ‍ॅपने सुरूवात केली आहे. अँड्रॉईड फोनच्या (Android) बिटा बिल्डमध्ये या नव्या इमोजींचा समावेश करण्यात येत आहे.

या इमोजी पॅकमध्ये फायर हार्ट, दाढी असलेले चेहरे त्यासोबतच अनेक चेहऱ्यांच्या इमोजींचा समावेश करण्यात आला आहे. अँड्रॉईडसोबतच अ‍ॅपलच्यादेखील (Apple) इमोजी पॅकमध्ये या फिचरचा समावेश असणार आहे. या नवीन इमोजी पॅकविषयी उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com