Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedभारतात मोबाइल इंटरनेट स्पीड आणि फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये घसरण

भारतात मोबाइल इंटरनेट स्पीड आणि फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये घसरण

नवी दिल्ली – New Delhi

भारताच्या मोबाइल इंटरनेट स्पीड आणि फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झाली आहे.

- Advertisement -

भारत मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये 129 व्या स्थानावर आहे, तर भारताचा फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये 65 वा क्रमांक आहे. तर, मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये मुस्लिम बहुल देश कतारने दोन स्थानांची झेप घेतल्यामुळे साउथ कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातला मागे टाकून कतार जगातील सर्वात जास्त मोबाइल इंटरनेट स्पीड असलेला देश ठरला आहे. तर, फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये थायलंड जगात अव्वल ठरला आहे.

स्पीड टेस्ड ग्लोबल इंडेक्स जेज्ञश्रर यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 13.51Mbps स्पीडच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात भारताच्या मोबाइल इंटरनेट डाउनलोड स्पीडमध्ये 4.4 टक्के घट झाली आणि भारताचा स्पीड 12.91Mbps एवढा नोंदवण्यात आला. तर याच महिन्यात भारताच्या सरासरी अपलोड स्पीड मात्र 1.4 टक्क्यांनी वाढल्यामुळे अपलोड स्पीड 4.90 Mbps वरुन वाढून 4.97 Mbps झाला आहे.

मोबाइल डाउनलोडिंग स्पीड सर्वाधिक कतारमध्ये 178.01 Mbps एवढा नोंदवण्यात आला. कतारनंतर 177.52 Mbps स्पीडसह संयुक्त अरब अमिरातचा नंबर लागतो.

या लिस्टमध्ये साउथ कोरिया तिसर्‍या, चीन चौथ्या आणि ऑॅस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे. तर, फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 53.90 Mbps नोंदवण्यात आला. या क्रमवारीत भारताचा 65 वा नंबर लागतो.

डिसेंबर महिन्यातील भारताचा फिक्स्ड ब्रॉडबँड अपलोड स्पीड 50.75 होता, तर नोव्हेंबरमध्ये 52.02 एवढा होता. थायलंड फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत अव्वल ठरला. थायलंडचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 308.35 Mbps होता. थायलंडनंतर अनुक्रमे सिंगापूर आणि हाँगकाँगचा क्रमांक आहे. तर, रोमानिया चौथ्या आणि स्विझर्लंड पाचव्या स्थानी आहे. जगाचा विचार केल्यास जागतिक सरासरी फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड डिसेंबर महिन्यात 96.43 Mbps होता, तर नोव्हेंबरमध्ये 91.96 Mbps एवढा होता. तर, अपलोडिंग ब्रॉडबँड स्पीड 49.44 Mbps वरुन 53.31 Mbps झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या